वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ९, अंबुला अभंग ९१५ ते ९३२

सुखाचा निधि सुखसागर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074603 · अभंग क्र. ९२७

927.
सुखाचा निधि सुखसागर जोडला ।
म्हणोनी काळा दादुला मज पाचारी गे माय ॥१॥
प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी ।
काळे वनमाळी आले घरा गे माय ॥२॥
बापरखुमादेविवर पुरोनी उरला ।
सबाह्यजु भरला माझे हृदयी गेमाये ॥३॥

अर्थ :
श्रीकृष्ण परमात्मा हा अगाध सुखाचा सागर आहे म्हणूनच याचा वर्ण काळा आहे. असा हा भ्रतार मला बोलावित आहे. या कृष्ण परमात्म्याच्या बोलावण्याने नवीन प्रेमसुखाची आज मला दिवाळी झाली. कारण असा हा शामतनु वनमाळी आज माझे घराला आला. माझे पिता व रखुमाईचे पति जे श्रीविठ्ठल हे माझ्या हृदयांत अंतरबाह्य भरून उरला आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग