वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

भक्ताचिया काजा अवतार

🙏 4. संत नामदेव · ABH-083776 · अभंग क्र. ४४४

444.
भक्ताचिया काजा अवतार धरी | कृपाळू श्रीहरी सांचोकार ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तीरी | उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥
वेद नेले म्हणोनि मत्स्य जाला हरी | शंखासुरा मारी आफळोनि ॥३॥
समुद्र मंथनी मंदार बुडाला | कांसव तो जाला तया तळी ॥४॥
हिरण्याक्षे धरा नेता रसातळा | वराहरुपे त्याला वधियेले ॥५॥
प्रल्हादासी पिता गांजी नानापरी | स्तंभी नरहरी प्रगटला ॥६॥
देवाचिया काजा वामन भूतळी | बळीसी पाताळी घातियेला ॥७॥
भूमिभार जाला क्षत्रियांचे कुळी | केली नि:क्षत्रिय परशुरामे ॥८॥
सीतेचिया काजा रावण मर्दिला | सूर्यवंशी जाला रामचंद्र ॥९॥
गोकुळी जन्मला श्रीकृष्ण आठवा | होऊनि पांडवा साहाकरी ॥१०॥
भक्ताचिया काजा बौद्ध अवतार | जाला दिगंबर अवनिये ॥११॥
कलंकि अवतार होणार श्रीहरी | तेव्हा पृथ्वीवरी तृण न उरे ॥१२॥
नामा म्हणे तुझे अनंत अवतार | काय मी पामर बोलू वाचे ॥१३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग