वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

ब्रह्मप्राप्ती पूर्ण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074480 · अभंग क्र. ५४५

545.
ब्रह्मप्राप्ती पूर्ण झाली ज्या नराला ।
अंतरबाह्य झाला प्रकाशची ॥१॥
बाहेर भीतरी लावी जैसा दीप ।
सबाह्य अमूप रूप फांके ॥२॥
अग्निसंगे लोहतत्त्व थोर नेटे ।
उभवतो दाटे हुताशन ॥३॥
तैसा ब्रह्मी लाहे हृदयी त्रिनेत्र ।
बाह्य निरंजन अवघा झाला ॥३॥
निवृत्तीचे पायी ज्ञानदेव लीन ।
जग जनार्दन निरंतर ॥५॥

अर्थ :
ज्याप्रमाणे कंदिलात दिवा लावला म्हणजे त्याच्या आंत बाहेर सर्व प्रकाश दिसतो. त्या प्रमाणे ज्या पुरूषाला ब्रह्मप्राप्ती झाली. त्याच्या आत बाहेर ज्ञानाचे तेज दिसते. लोखंड अग्नीत ठेवून तापवले म्हणजे ते जसे अग्नीमय होते. त्या प्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर ब्रह्मज्ञानी पुरूषाला तिसरा ज्ञाननेत्र प्राप्त होतो. व मायेचे आवरण नाहीसे होते. मी निवृत्तीच्या पायी लीन झाल्यामुळे सर्व जगत मला जनार्दनरुपच दिसू लागले असे माऊली ज्ञानदेव सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग