आता माझा नेणो परतो भ
4044.
आता माझा नेणो परतो भाव । विसावोनि ठायी ठेविला जीव । सकळा लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायी ॥१॥
भांडवल गाठी तरि विश्वास । झालो तो झालो निश्चय दास । न पाहे मागील ते वास । पुढती सोस सेवेचाची ॥धृपद॥
आहे ते निवेदिले सर्व । मी हे माझे मोडियला गर्व । अकाळी काळ अवघे पर्व । झाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥
वेव्हारी वेव्हारा अनंत । नाही यावांचुनी जाणत । तरी हे समाधान चित्त । लाभहानी नाही येत अंतरा ॥३॥
करूनि नातळो संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनी खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥
बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलो सोवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळा लेइलो ते ॥५॥
अर्थ :
आता माझा देवाविषयी जो दृढ भक्तिभाव आहे तो पुन्हा कधीही माघारी फिरणे शक्य नाही कारण माझा जीव देवाच्याच ठिकाणी विश्रांत पावला आहे आणि तेथेच मी माझा जीव ठेवला आहे. कारण देवाचे ठिकाण म्हणजे सर्व लाभ प्राप्तीचे एकच तेवढेच ठिकाण आहे असा दृढनिश्चय माझ्या चित्ताच्या ठिकाणी झाला आहे. माझ्या पदरात विश्वास हेच एक भांडवल आहे त्यामुळे मी निश्चयाने देवाचा दास झालो आहे. आता मागे संसाराचे प्रपंचाचे काय होईल याविषयी मी काहीच विचार करणार नाही तर पुढे हरीची सेवा करण्याचाच हव्यास, निश्चय केला आहे. माझ्या मनात जे काही होते ते सर्व काही निवेदन केले आहे आता सर्व प्रकारचा गर्व मोडून टाकला आहे. काळ चांगला असो किंवा अकाळ म्हणजे वाईट असो सर्व काळ मला चांगल्या पर्वाप्रमाणेच म्हणजे चांगला आहे कारण मला देवाच्या कृपेचा लाभ झाला याविषयी पूर्णपणे भरवसा आला आहे. कोणताही व्
