वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

नाचे टाळी पिटी । प्र

🙏 3. संत तुकाराम · ABH-077793 · अभंग क्र. ४३६

436.
नाचे टाळी पिटी । प्रेमे अंग धरणी लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरीजन ॥धृपद॥
न धरिती लाज । नाही जनासवे काज ॥२॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्री जळ लोटे ॥३
॥
अर्थ :
खरे भोळे भाविक भक्त हे नाचतात हरीनाम घेताना टाळी वाजवतात धरणीवर अंग टाकून लोळण घेतात हरीछंदात मग्न असतात, असे जे भोळे भाविक माझे मित्र ते अतिशय सज्जन आहेत ते मला फार आवडतात. ते मनात मुळीच लाज धरत नाहीत कारण त्यांना लोकांशी काही कर्तव्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या प्रेमाने त्यांचा कंठ सद्गतीत होऊन त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू येत असतात, असे भक्त मला फार आवडतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग