विषय सेविता तुज | नव
1918.
विषय सेविता तुज | नव्हे पुढील काज |न भेटे तुज | गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥
काय करिसी खटपट | वाया मार्ग दुर्घट |वरपडा होसी कष्ट | परि तरो नेदिती ॥२॥
सुटकेचे मूळ जाण | रामकृष्ण नारायण |येणे तुटेल भवबंधन | जन्मा न येसी सर्वथा ॥३॥
साधन इतुकेंचि पुरे न लागती मंत्रांचे भारे |ते बुडविती साचारे| परि तरो नेदिती ॥४॥
नामा म्हणे ते पामर | नेणतीच हा मार्ग सार |हरी वाचे नाही उच्चार | तो जाणावा महादोषी ॥५॥
