वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ४, फुगडी अभंग ८५७

फुगडी फूगे बाई फुगडी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074605 · अभंग क्र. ८५७

857.
फुगडी फूगे बाई फुगडी फू ।
निजब्रह्म तू गे बाई परब्रह्म तू गे ॥१॥
मन चित्त धू ।
विषयावरी थू ॥२॥
एक नाम मांडी ।
दुजा भाव सांडी ॥३॥
हरि आला रंगी ।
सज्जनाचे संगी ॥४॥
सकळ पाहे हरि ।
तोचि चित्ती धरी ॥५॥
नमन लल्लाटी ।
संसारेसी साटी ॥६॥
वाम दक्षिण ।
चहूंभुजी अलिंगन ॥७॥
ज्ञानदेवा गोडी ।
केली संसारा फुगडी ॥८॥

अर्थ :
माऊली या अभंगामध्ये फूगडी या खेळाचे च रुपक सांगत आहेत. फुगडी म्हणजे फुगडी. खेळ खेळत असता खेळणारी मुले, एकमेकांचे भांडण झाले म्हणजे 'फुगडी' म्हणून त्यांचे मित्रत्व टाकून देतात. याच दृष्टांताप्रमाणे संसारामध्ये आसक्त असलेल्या एका स्त्रीस दुसरी ब्रह्मरुप झालेली स्त्री सांगते की तुझी गडी फु, कारण तू संसाराच्या नादी लागून आपल्या जन्माचे नुकसान केले आहेस. खरे पाहिले तर तू ब्रह्मरुप होतीस. पण या प्रपंचाच्या नादाने तू विषयासक्त झालीस. याकरिता तू आपले मन स्वच्छ कर. विषयांवर थूंक. एक भगवन्नामाच्या ठिकाणी विश्वास ठेव. व इतर सर्व साधने टांकून दे. माझ्याकडे पहा संतांच्या संगतीमुळे माझ्या हृदयांत हरि रंगला आहे. तुही सर्वत्र व्यापक असलेला हरीच चित्तात धर. संसार आपल्या प्रारब्धाने चालत असतो, म्हणून त्यांच्यात मन न घालता परमात्म्याच्या ठिकाणी ते मन लाव. म्हणजे त्या चर्तुभुज श्रीहरिला तुझ्याकडे पाहून फार आनंद होईल. व त्याआनंदाने तो तुला आपल्या चारी भुजांनी आलिंगन देईल मला त्या हरिनामाची गोडी लागल्यामुळे मी संसारासी फु, गडी' करुन टाकली म्हणजे संसाराचे मित्रत्व टांकले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग