वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 19. संत भानुदास › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा › 1. संत भानुदास महाराज अभंग गाथा एकूण अभंग 94 › 4. नाममहिमा

संत भानुदास अभंग नाम

🙏 19. संत भानुदास · ABH-074178 · अभंग क्र. ३६

३६.
संत भानुदास अभंग नाममहिमा

आमुचिये कूळीं पंढरीचा नेम ।
मुखी सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥
न कळे आचार न कळे विचार ।
न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥
असों भलते ठायी जपूं नामावळी ।
कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥
भानुदास म्हणे उपदेश आम्हा ।
जोडिला परमात्मा श्रीराम हा ॥४॥

३७.

जपतां नाम विठठलांचे ।
भय नाही हो काळांचे ॥१॥
नाममंत्र त्रिअक्षर ।
करी सदा तो उच्चार ॥२॥
विठ्ठलनामें सुख आनंद ।
भानुदासा परमानंद ॥३॥

३८.

तुमचे नाम गोड नाम गोड ।
पुरवी कोड जीवांचें ॥१॥
वाचे सुलभ नामावळी ।
महादोषा होय होली ॥२॥
सुख अनुपम्य गाता नाम ।
भानूदास म्हणे आम्हा विश्राम ॥३॥

३९.

नामाचा महिमा शुक सांगे ।
परिक्षिती राजा जाणे अंगें ॥१॥
जपतांचि रामकृष्ण नामे ।
दहन होती कर्माकर्मे ॥२॥
नामे दया शांति क्षमा ।
नामे शीतळ शंकर उमा ॥३॥
नाम जप ध्यानीं मनी ।
भानुदास वंदितो चरणी ॥४॥

४०.

एक नामापरतें साधन ।
नाही नाही दुजे आन ॥१॥
वाया धावतीं बराडी ।
करती संसाराची जोडी ॥२॥
न चुकें जन्ममरण वेरझारा ।
हे तो नकळे पामरा ॥३॥
नामा वांचुनि जें जें कर्म ।
अवघा जाण तो अधर्म ॥४॥
भानुदास प्रेमे नाचे ।
सदा नाम घोष वाचे ॥५॥

४१.

चार युगांमांजीं पावन ।
कलिमांजीं सोपें भजन ॥१॥
मना दृढ करुणि साचा ।
विठ्ठल विठ्ठल वदे वाचा ॥२॥
संकल्प विकल्प नको भिन्न ।
तेणें पावे हरिचरण ॥३॥
नामे जीवींचा जिव्हाळा ।
भानुदास जीवनकळा ॥४॥

४२.

तारक नाम सोपें साचे ।
विठ्ठल विठ्ठल वदतां वांचे ॥१॥
जन्ममृत्यूचें खंडन ।
पापातापाचें दहन ॥२॥
नामे निजध्यास देखा ।
भानुदासा सुखे सुखा ॥३॥

संत भानुदास अभंग नाममहिमा समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग