वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आता मी न पडे सायासी

🙏 3. संत तुकाराम · ABH-079849 · अभंग क्र. ४०३०

4030.
आता मी न पडे सायासी । संसारदुःखाचिये पाशी । शरण रिघेन संतांसी । ठाव पायापाशी मागेन त्या ॥१॥
न कळे संचित होते काय । कोण्या पुण्ये तुझे लाधती पाय । आता मज न विसंबे वो माय । मोकलूनि धाय विनवीतसे ॥२॥
बहुत जाचलो संसारे । मोहमायाजाळाच्या विखारे । त्रिगुण येताती लहरे । तेणे दुःखे थोरे आक्रंदलो ॥३॥
आणीक दुःखे सांगो मी किती । सकळ संसाराची स्थिती । न साहे पाषाण फुटती । भय काप चित्ती भरलासे ॥४॥
आता मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालो वेडा असोनि जाणता । पावे अनंता तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
देवा आता मी इतर कोणत्याही आणि संसारदु:खाच्याही कष्टात पडणार नाही. आता मी संतांना शरण जाईन आणि त्यांच्या पायाच्या ठिकाणी मी आश्रय मागेन. देवा माझे संचित काय होते आणि कोणत्या पुण्याईने तुझ्या पायाची मला प्राप्ती होईन हे मला काही समजत नाही. त्यामुळे हे माझे आई विठाई तू मला आता विसरु नकोस मी तुला धाय मोकलून विनवीत आहे. मी या संसाराने आणि मोहमायेच्या विषाने खूप जाचलो आहे. त्यामध्येच सत्व, रज आणि तम हे तीनही गुणाच्या लहरी येतात व याने दु:ख उत्पन्न होते त्यामुळे मला फार दु:ख होते व मी खूप आकांत करतो. देवा या संसाराच्या स्थितीमध्ये अजून किती दु:ख आहेत हे मी किती सांगावे ? हे दु:ख मला सहन होत नाही या दु:खाने तर पाषाण देखील फुटतील हे भय चित्तामध्ये इतके भरले आहे की, त्या भयाने माझे शरीर देखील थरथर कापत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मला या संसार घाणीची वार्ता कोणत्याही प्रकारे सहन होत नाही. देवा मी सर्व जाणता असून देखील वेडा झालो आहे त्यामुळे हे अनंता त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग