वाजविली डांक चौक ठेव
2114.
वाजविली डांक चौक ठेवियला वो |ठायी पंढरीचे विठ्ठले तुज हाकारा केला वो ॥१॥
रंगा येई बो खेचरे विठाई सुंदरी वो |तुझी पाऊले गोजिरी के मी दृष्टि देखेत बो ॥२॥
पाजळला दीपु फिटला अंधकारू वो |न लावा उशीरू पांडुरंगे माउलिये बो ॥३॥
तमोगुणाचा रज जाळूनि धूप केला बो |उशिरू का लाविला पांडुरंगे माउलिये वो ॥४॥
तनुमनाची मूद टाकीन वोवाळूनी तुजवरोनी वो |वैकुठवासिनी पांड्रंगे माउलिये वो ॥५॥
अहंकार दैवते झडपिले नामयासी वो |येउनिया रंगासी रंग राखी आपुला वो ॥६॥
