होतो ते चिंतीत मानसी
4041.
होतो ते चिंतीत मानसी । नवस फळले नवसी । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाही ॥१॥
धरिले जीवे न सोडी पाय । आले या जीवित्वाचे काय । कै हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचिताने ॥धृपद॥
मज तो पडियेली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळे गोवी केली । दृष्टि उघडली बरे झाले ॥२॥
आता हा सिद्धी पावो भाव । मध्ये चांचल्ये न व्हावा जीव । ऐसी तुम्हा भाकीतसे कीव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥
कळो येते आपुले बुद्धी । ऐसे तो न घडे कधी । येवढे आघात ते मधी । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥
कृपा या केली संतजनी । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥५॥
अर्थ :
आजपर्यंत मनामध्ये मी ज्याच्याविषयी चिंतन करीत होतो आणि जो नवस केला होता ते दोन्हीही फलद्रुप झाले आहेत. त्या दोन्हीची प्राप्ती मला झाली आहे. अविट व ज्याचा कधीही नाश होणार नाही अशा नारायणाची प्राप्ती मला झाली आहे. या नारायणाचे पाय मी माझ्या जीवाशी दृढ धरले आहे ते मी कधीही सोडणार नाही मग त्याच्यापुढे माझ्या जीवित्वाचे तरी काय आले, त्याची देखील मी पर्वा करणार नाही. मला नारायणाच्या स्थळाची प्राप्ती कधी झाली असती, परंतू माझे पूर्व संचित हे अतिशय चांगले होते त्यामुळे तर मला त्याने या मार्गाला लावले आहे. मला तर खरोखर भूल पडली होती त्यामुळे तर माझ्या चित्ताची देखील उफराटी चाल म्हणजे वागणूक झाली होती. मला प्रपंचरुपी मृगजळाने त्यामध्ये फार गुंतून टाकले होते परंतू आज माझी ज्ञानदृष्टी पुन्हा उघडली त्यामुळे हे फार बरे झाले. देवा आता माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी जो भक्तिभा
