किती शिणताती प्रपंच
15.
किती शिणताती प्रपंच परमार्थ । परी न घडे सर्वथा हित कोणा ॥१॥
न घडे प्रपंच न घडे परमार्थ । न घडेचि स्वार्थ दोन्ही विषी ॥२॥
एकाची एकास न पडेचि गांठी । तेणे होय कष्टी सुखदुःखे ॥३॥
सोयरा चोखियाची म्हणे पंढरीराया । दंडवत पाया तुमचिया॥81
