वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

यज्ञ याग दान व्रत उद

🙏 4. संत नामदेव · ABH-082840 · अभंग क्र. १५०७

1507.
यज्ञ याग दान व्रत उद्यापन | हे नेणे मी साधन काय करू ॥१॥
जप तप होम स्वधर्माचरण | नव्हे तीर्थाटण कांही मज ॥२॥
गया पिंडदान प्रयागीचे स्नान | कर्म अनुष्ठान नव्हे मज ॥३॥
भक्ति उपासना देवाचे पूजन | ध्यान उपोषण नव्हे मज ॥४॥
पृथ्वीचे भ्रमण अनुताप संपूर्ण | सारासार खूण नकळे कांही ॥५॥
पुण्य नाही गांठी पापाचे संचित | परम पतित वाटे मज ॥६॥
माझा देह आहे पातकांचा थारा | मी अपराधी खरा कळलेसे ॥७॥
पुराणप्रसिद्ध नाम तुझे सार | ऐसे निरंतर बोलताती ॥८॥
अन्यथा वचन नोहे है प्रमाण | तरी ब्रीदे जाण सांडवली ॥९॥
तुम्ही ब्रीद आपुले जतन करणे | तरी नारायणे सांभाळावे ॥१०॥
नामेंविण कांही आम्हांपाशी नाही | विचारोनी पाही पांडुरंगा ॥११॥
धन वित्त सर्व आमची हे जोडी | नामा म्हणे गोडी नामी तुझे ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग