ठेवणे मागती वडिलांचे
483.
ठेवणे मागती वडिलांचे लोक ।
म्हणउनी भीक मागतोसी ॥१॥
सोंगसंपादणी आहे मज ठाऊकी ।
तुझी म्या पारखी असे केली ॥२॥
ठेवण्याचा लोभ धरूनी अंतरी ।
अंबऋषीवारी गर्भ दहा ॥३॥
लहण्याची आस धरूनि ध्रुवाला ।
नेऊनी गोविला अढळपदी ॥४॥
बहेणि म्हणे एका देऊनिया सिद्धि ।
अंतरीची बुद्धी कुडी खरी ॥५॥
