मेळवोनि मेळा गोपाळां
27.
मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥ ठेवियले लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥ एका जनार्दनी तयाचे कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिका ॥४॥