भूतमात्र आकृति एकचि
591.
भूतमात्र आकृति एकचि मूर्ती । अवघा अंतर्गति व्यापुनी ठेला ॥१॥
जळीं स्थळीं कांष्ठीं स्थावर जंगम । अवघा आत्माराम पूर्णपणे ॥२॥
सायंप्रातर्मध्याह नाही अस्तमान । आणिक कारण नोहेंदुजें ॥३॥
एका जनार्दनी सव्राह्म भरला । भरुनी उरला पंढरीये ॥४॥
