मार्गी जाता विस्मय क
59.
मार्गी जाता विस्मय करी । कैसे विंदान केले नवल परी । आम्ही अबला घालितो अचोरी । श्रीहरी परापश्यंती वेगळा ॥१॥ नवल जाहलें काय सांगू माये । चोरी करिता धरिला पाहे । घरां घेऊनि जाता उभा आहे । न कळे विंदान सये काय सांगू ॥२॥ एका जनार्दनी परिपूर्ण । व्यापाक सर्वाठायीं संपूर्ण । जनींवनीं जनार्दनी । पाहता महिमान न कळे ॥३॥
