वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वासुदेव)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079831 · अभंग क्र. ३९२७

3927.
(वासुदेव)
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून ।
जागे होउनि करा काही दान । नका ऐकोनि झाको लोचन गा ॥१॥
हरी राम कृष्णा वासुदेवा । जाणवितसे जना ।
चिपळ्या टाळ हाती विणा । मुखी घोष नारायणा गा ॥धृपद॥
जे ठाकेल कोणा काही । फळ पुष्प अथवा तोयी ।
द्या परी मीस घेऊ नका भाई । पुढे विन्मुख होता बरे नाही गा ॥२॥
देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त ।
झाले एक चित्त तरी बहुत । येवढ्यासाठी नका करू वाताहात गा ॥३॥
आलो येथवरी बहु सायासे । करिता दान हेचि मागावयास ।
नका भार घेऊ करू निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥
आता मागुता येईल फेरा । हे तो घडे या नगरा ।
म्हणे तुकयाबंधु राम धरा । ओळखी नाही तरी जाल अघोरा गा ॥५॥

अर्थ :
अरे गर्भवास, बाळपण आणि तारुण्य असे तीन प्रहर टळले आहेत अजून देखील तुम्ही असे झोपलेले का आहात ? त्यामुळे स्वहिताविषयी जागे व्हा आणि काहीतरी हरिनामरुपी दान करा उगाच डोळे झाकून राहू नका. हरे राम कृष्णा या भजनाविषयी मी वासुदेव लोकांना जाणीव करुन देत आहे. हातामध्ये टाळ, वीणा, चिपळया घेऊन मुखाने नारायण घोष करीत आहे. कोणाला जे काही सापडेल फळ, पुष्प अथवा पाने काहीही असो ते देवाला अर्पण करा. हे माझ्या बंधूंनो तुम्ही झोपण्याची मिस घेऊ नका स्वत:चे हित करण्याविषयी विन्मुख होऊ नका कारण तुमच्यासाठी पुढे ते बरे नाही. देवाला केवळ एकनिष्ठ भक्तिभाव लागतो तो त्याच्यासाठी प्रमुख कारण आहे, मुख्य आहे या व्यतिरिक्त देवाला काहीही अर्पण करावे लागत नाही. एक चित्त जरी झाले तरी ते खूप आहे तेवढयासाठी तुम्ही स्वत:ची वाताहात करुन घेऊ नका. मी खूप साहस कर

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग