वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आता धर्माधर्मी काही

🙏 3. संत तुकाराम · ABH-079828 · अभंग क्र. ४०३७

4037.
आता धर्माधर्मी काही उचित । माझे विचारावे हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि झालो ॥१॥
येथे राया रंका एकी सरी । नाही भिन्नाभिन्न तुमच्या घरी । पावलो पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावे ॥धृपद॥
ऐसे हे चालत आले मागे । नाही मी बोलत वाउगे । आपुलिया पडिल्या प्रसंगे । कीर्ती हे जगे वाणिजेते ॥२॥
घालोनिया माथा बैसलो भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधी हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसे ॥३॥
येथे एक वर्म पाहिजे धीर । परि म्या लेखिले असार । देह हा नाशिवंत जाणार । धरिले सार नाम तुझे ॥४॥
केली आराणुक सकळा हाती । धरावे धरिले ते चित्ती । तुका म्हणे सांगितले संती । देई अंती ठाव मज देवा ॥५॥

अर्थ :
देवा आता काही तरी धर्माधर्म आणि उचित पाहून माझ्या हिताचा तुम्ही विचार करा. देवा तुला माहित आहे की, मी पतित आहे त्यामुळे तर मी तुला शरण आलो आहे. देवा तुमच्या घरी राजा आणि रंक हे सर्व सारखेच आहे आणि भिन्न भिन्न हे प्रकार तुमच्याकडे नाहीत. आता मी कसा तरी देवा तुझ्या घरामध्ये पोहोचलो आहे त्यामुळे तू आता मला बाहेर घालवू नकोस माझ्यासारख्या पतितांचा उध्दार करण्याची रीत ही तुमची मागेपासून चालत आलेली आहे त्यामुळे मी काही वावगे बोलतो आहे असे देखील नाही. देवा तुम्ही पतितांचा उध्दार करता असे तुमची किर्ती सर्व जग वर्णन करते आहे. देवा मी तुमच्या माथ्यावर माझ्या योगक्षेमाचा भार घालून निश्चिंत बसलो आहे आणि सर्व लौकिक व्यवहाराचा मी त्याग केला आहे. देवा आपले पद हे अविनाश आहे या गोष्टीचाही विचार मी आधी केला आहे. देवा तुझ्या प्राप्तीसाठी एकच वर्म पाहिजे ते म्हणज

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग