अवघ्या दशा येणे साधत
4046.
अवघ्या दशा येणे साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती । प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनिया ॥१॥
बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळा काळांचे हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥धृपद॥
जेथे कीर्तन हे नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥
येती अंगा वसती लक्षणे । अंतरी देवे धरिले ठाणे । आपणचि येती तयांचे गुण । जाणे येणे खुंटे वस्तीचे ॥३॥
न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळीचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचे ॥४॥
वेदपुरुष नारायण । योगियांचे ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा ॥५॥
अर्थ :
हरीची सगुण भक्ती करणे हीच मुख्य उपासना असून यानेच सर्व काही साध्य होते. आणि भक्तांचा शुध्द भक्तिभाव जाणून हरीची मूर्ती ह्दयामध्ये प्रगट होते. हरीचे नाम हेच सर्व फळ, सर्व पुण्य व सर्व धर्माचे मुख्य बीज आहे. सर्व ज्ञानपणाचे वर्म देखील हरीचेनाम आहे आणि सर्व संसारातील श्रम निवारण करण्याचे साधन बीज नामच आहे. जेथे हरीचे दास निर्लज्ज होऊन हरी किर्तन व हरीनामाचा घोष करत असतात, अश्या हरीनामाच्या ठिकाणी सर्वची सर्व म्हणजे नऊ रस येऊन आश्रयाला राहातात आणि हरीनामाने सर्व भवबंधनाचे पाश तुटतात. ज्याच्या अंत:करणात देवाने ठाण मांडून ठेवले आहे म्हणजे वास केला आहे त्याच्या अंगी शुध्द भक्तीची लक्षणे ज्ञानाची लक्षणे लगेच वास्तव्याला येतात. आपणच आपले येऊन ते गुण त्याच्या ठिकाणी राहातात आणि जन्ममरणरुपी येणे जाणे खुंटित होते. हरीची सगुण भक्ती करण्यासाठी आपला आश्रम टाकावा लागत नाही कि
