(प्रार्थना)
4092.
(प्रार्थना)
मागणे ते एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहे पांडुरंगा ॥१॥
या संतांसी निरवी हे मज देई । आणिक दुजे काही न मगे तुज ॥२॥
तुका म्हणे आता उदार तू होई । मज ठेवी पायी संतांचिया ॥३॥
अर्थ :
पांडुरंगा माझे एकच मागणे तुझ्याजवळ आहे आणि ते तुला देता आले तर पहा. देवा या संतांच्या हवाली मला कर त्यांच्या स्वाधीन कर यापेक्षा दुसरे काहीही मागणे मी तुला मागणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा आता तो उदार हो आणि मला दान दे या संतांच्या पायाजवळ मला कायम ठेव.
Tukaram maharaj SARTHA gataha समाप्त
