वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

केवळ निराभास या जगी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074470 · अभंग क्र. ५०६

506.
केवळ निराभास या जगी जाहला ।
नाही आन उरला भास काही ॥१॥
संकल्प विकल्प असती मनाचे ।
छेदियले साचे भवभ्रम ॥२॥
वासनेचे मूळ टाकिले खणोनी ।
जिवित्व गिळूनी शिवरूप ॥३॥
काम क्रोध लोभ दडले ते सहज ।
केले अति चोज सांगवेना ॥४॥
ज्ञानेश्वर नाम हेही गिळूनिया ।
मूळ अंती मायातीत शुद्ध ॥५॥

अर्थ :
आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याचा प्रकाशक दुसरा कोणीही नाही. म्हणून त्याला निराभास म्हणतात. हे जगत, निराभास आत्मरूपच झाले त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही भासण्याला राहिले नाही. जगत म्हणजे काय विचाराल तर ते मनकल्पित आहे. ते आत्मज्ञानाने जर दूर केल्यास
संसार भ्रमाचा निरास होईल. मग जीवाचा जीवपणा जाऊन तो जीव शिवरूप होतो. असे झाल्यामुळे काम क्रोध, लोभ यांचा निरास होऊन जातो. माझी कायारूप भ्रांती नाहीसी झाल्यामुळे माझ्या ठिकाणी ज्ञानेश्वर हे नांव देखील उरले नाही म्हणजे मी शुद्ध स्वरूप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग