वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

प्रभातेसी उठोनी । स्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087312 · अभंग क्र. ४७७

477.
प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनी । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥
धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥
करे नेमे एकादशे । जाय नेमे पंढरीसी । ऐसे या तीर्थासी नेमे करिता जोडें ॥३॥
सर्व पर्वकाळ घडे । कोटी अश्वमेध जोडे । पुण्य ते उघडें । विठ्ठलरुपडे पाहता ॥४॥
ऐसा जया नेमधर्म । न चुके वाचा नामस्मरण । एका जनार्दनी स्मरण । विठ्ठलदेवी आवडी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग