जंबु या द्वीपामाजी ए
2115.
जंबु या द्वीपामाजी एक पंढरपुर गांव | धर्माच नगर विठो पाटील त्याचे नाव |
चला जाऊ तया ठाया | कांही भोजन मागावया ॥१॥
विठोबाचा धर्म जागो | त्यांचे चरणी लक्ष लागो ॥ ध्रू. ॥
ज्यासी नाही पंखपाय तेणे करावे ते काय |शुद्धभांव धरूनी पंढरीसी जाय |
इच्छिले फळ देतो यासी नवलाव ते काय ॥२॥
सुदामा ब्राह्मण दुःखे दरिदे पीडिला |मुष्टिपोहे घेऊनि त्याचे भेटीलागी गेला |
शुद्धभाव देखोनिया गांव सोनियाचा दिळा ॥३॥
गण आणि गोत्रज सवे हासताती मज |गेले याचे मानुषपन येणे सांडियेली लाज |
विनवी तो शिपी नामा संतचरणींचा रज ॥४॥
