वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ३, हमामा अभंग ८५५ ते ८५६

हमामा घाली बाळा ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074614 · अभंग क्र. ८५६

856.
हमामा घाली बाळा ।
सांडी खोटा चाळा ।
फोडीन तुझा टाळा ।
वाकुल्या दावीन काळा ॥१॥
हमामा रे पोरा हमामा रे ॥धृपद॥
हमामा घाली बा रे ।
अंगी भरले वारे ।
चाखती पिकली चारे ।
जाऊ वरील्या द्वारे रे पोरा ॥२॥
हमामा घाली नेटे ।
सांडी बोलणे खोटे ।
आता जासील कोठे ।
कान्होबाचे बळ मोठे रे पोरा ॥३॥
हमामा घाली सोई ।
सांभाळी सवा दोही ।
एक नेमे तू राही ।
तेथे बहु सुख पाही रे पोरा ॥४॥
हमामियाचा नाद वाजे ।
अनुहाते कोपर गाजे ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु राजे ।
रत्नजडित मुगुट साजे रे पोरा ॥५॥

अर्थ :
हमामा घाल. प्रपंचाचा खोटा चाळा सोडून दे. देहाभिमानाचा तुझा खोटा चाळा आहे. त्यामुळे काळ नाश करतो. परंतु त्या देहाभिमानाचे टाळके फोडून बाध कर म्हणजे तुझा नाश करणाऱ्या काळाला वाकुल्या दाखव. हमामा रे पोरा हमामा हमामारे पोरा हमामा. हमामा घाल हमामा घालू लागले असता अंगांत वारे भरते. त्या वाऱ्याच्या नादांने रानांतील चारा खाते. तो खाण्यांकरिता आपल्या वरल्या दाराने म्हणजे कामी मुखाच्या दाराने वरती जाऊ. चांगल्या रितीने हमामा घाल. खोटे बोलणे टाकून दे. असे केले म्हणजे. हा कान्होबा मोठा बलवान आहे. तो आपल्याशी तुझे ऐक्य करुन घेईल. असे झाले म्हणजे मग कोठे जाशील. हमामा अशा सोयीने घाल की. ज्याच्या दोन्ही बाजू सांभाळल्या जातील. परमात्मस्वरुपांविषयी एक नेम करुन तू राहिलास तेथे फार सुख आहे हमाम्याचे नादाने पोरे हात नाचवून, तोंडाने काही आवाज करीत असतात. परंतु या हमाम्यात अनुहात. ध्वनीची गर्जना होते. तोच नांद वाजत असतो. ज्याच्या मस्तकांवर रत्नजडित मुकुट शोभत आहे. असा जो, माझे पिता व रखुमाईचे पती, श्रीविठ्ठलराय स्वरूपांच्या ठिकाणी हा हमामा घालावयाचा आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग