वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

बहुता वऱ्हाडा आलीसी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074848 · अभंग क्र. २१६

216.
बहुता वऱ्हाडा आलीसी बाळा ।
हांसती लोक परी न संडी चाळा ॥
एकाचे खाये एकांसी गाये ।
लाज नाही तीसी सांगावे काये ॥
वऱ्हाडीयांच्या भुलली सुखा ।
भोगिता पावली दुःखा ॥
नाथिले पुसे भलत्यासी रुसे ।
ज्यांचे लेणे लेऊनी थोर संतोषे ॥
क्षणाचा सोहळा मानिस हित ।
आपस्तुती परनिंदेचे गीत ॥
कवणाचे वहाड भुलली वाया ।
शरण रिपे रखुमादेविवरा नाह्या ॥

अर्थ :
हे मुली, तू अनेक वेळा जन्ममरणरूपी लग्नाला विषयरूपी वऱ्हाडबरोबर घेऊन आलीस तुझ्याकडे बघून साधुसंत हंसतात. पण तू मात्र जन्ममरणाचा चाळाटाकीत नाहीस. परमात्म्याच्या सत्तेवर तुझे जगणे आहे. पण तू कौतूक मात्र शरिराचे करीतेस. याची तुला मुळीच लाज वाटत नाही. अशा तिला काय म्हणावे. विषयातल्या सुखाला भूलून ते सुख भोगीत असता तुला दुःखच होते. मला नित्य सुख असावे असे खोटेच विचारून परमतत्त्वालाच विसरून जातेस. परमात्म्याच्या सुखाचा अलंकार घालून तुला आनंद होतो व पहावे तर परमात्म्यालाच विसरून जाते. क्षणिक विषयसुखात आनंद मानून स्वतःची अशी स्तुती व दुस-याची निंदा हेच गीत नेहमी गात बसतेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विषयरूपी वहाड कोणाचे त्यांचा तुझा काही एक संबंध नसता फुकट भुलून गेली आहेस. म्हणजे त्या विषयात निमग्न झाली आहेस. परंतु तू विषयरूपी वहाडाचा त्याग करून रखुमादेवीवर बाप जो श्रीविठ्ठलत्याला शरण जा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग