वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ६, उपासना अभंग १६१ ते १६६

विठ्ठलयात्रे जाती वो

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074909 · अभंग क्र. १६५

165.
विठ्ठलयात्रे जाती वो माये । त्याचे धरीन मी पाये ॥
विठोबा माझी माहेर । भेटेन बुद्धि परिकर ॥
रखुमादेविवर विठ्ठले । मन ठेउनी राहिले निर्धारे ॥

अर्थ :
श्री विठ्ठलाची यात्रा करणारे वारकरी त्यांचे पाय मी धरिन. विठोबा माझे माहेरच आहे. त्यामुळे त्या माझा माहेरच्या लोकांच्या दर्शनाला मी मनापासुन जाईन. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणी माझे मन बांधुन मी निवांत राहिन असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग