मेघवृष्टिने करावा उप
165.
मेघवृष्टिने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य ।
वाटा लाभे त्यास । केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्नछत्री । भूती द्यावे सर्वत्र ।
न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती पोसणा ॥२॥
बीज न पेरावे खडकी । ओल नाही ज्याचे बुडखी ।
थीता ठके शेखी । पाठी लागे दिवाण ॥३॥
गुज बोलावे संतांसी । पत्नी राखावी जैसी दासी ।
लाड देता तियेसी । वाटा पावे कर्माचा ॥४॥
शुद्ध कसुनि पाहाबे । वरिला रंगा न भुलावे ।
तुका म्हणे घ्यावे । जया नये तुटी ते ॥५॥
