!!! संत तुकाराम चरित
!!! संत तुकाराम चरित्र !!!
प्रस्तावना.... !
आतापर्यत रामायण, महाभारतातील पात्रांचे आपण उत्साहाने स्वागत केलेत.
आता ज्यांच्यामुळं भागवत धर्माची पताका महाराष्टातील घरांघरांत झाला, ते पात्र घेऊन येत आहे.
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१
🪔
तुकाराम महाराज यांचे चरित्र्य सुरुवात करण्यापुर्वी त्यांच्या पुर्वीच्या सात-आठ पिढ्यांची माहिती सांगणे आवश्यक आहे, कारण तुकाराम कसे घडले ? विठ्ठलाच्या भजनी कसे लागले ? त्याशिवाय कळणार नाही.
पुण्याच्या उत्तरेस सुमारे दहा कोसांवर इंद्रायणी नदीच्या तीरी देहु हे तुकारामाचे जन्म गांव. देहु गावातील प्रतिष्ठीत घराण्यांत तुकोबांच्या घराण्याची गणना होत होती. या घराण्याकडे महाजनकीची मिरास, बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा, महाजनकीचा अधिकार व उत्पन्न, श्रीसंनिध वाडा आणि श्रीची पुजाअर्चा पुर्वीपासुन होते. याशिवाय त्यांचे वडिल शेती, सावकारी, आणि वाण्याचे दुकान चालवित. विठोबा हे त्यांचे कुलदैवत !
🪔
सातार्या जिल्हात जावळी येथे मोरे घराणे शेकडों वर्षे नांदत होते. महाराष्टातील मराठा सरदारात या घराण्याला बरेच महत्व होते. परंतु कौरव-पांडवांपासुन चालत आलेली क्षत्रियातील भाऊबंदकी ह्या मोरे घराण्यांत जन्माला आल्यामुळे अनेक अनिष्ट प्रकार होऊ लागल्यामुळे घराण्यांच्या लौकीकास कमीपणा येऊ लागला. या सर्व गोष्टींमुळे विश्वंभराचे मन उचाट, उदास झाल्याने त्यांनी घरादाराचा, भाऊबंदगीचा त्याग करुन कायमची जावळी सोडुन देहु गांवी कायमचे वास्तव्य केले. थोड्याच दिवसांत देहु गांवची महाजनकी, शेतीवाडी संपादन करुन घराण्याच्या मुळ वैभवास साजेसा लौकीक मिळवला. पण एवढे करुनही त्यांना समाधान लाभेना. संसाराची उदासीनता वाढु लागली. संसारसुखापेक्षा परमार्थाकडे त्यांचा कल दिसुं लागला.
🪔
विश्वभरांनी संसारांतुन मन काढून अहोरात्र भजनांत वेळ घालवुन पंढरपुरच्या अनेक वार्या केल्यात. पुढे ते थकल्यामुळे वारी करता येत नसल्यामुळे ते सारखे तळमळत. त्यांची भक्ती पाहुन त्यांना दृष्टांत झाला की, आंबेवनात विठोबाची यां मुर्ति आहे तीचे पुजन कर !
🪔
त्यांनी गांवकर्यांच्या सहाय्याने आंबेवनात सापडलेली मुर्ती वाजत गाजत आणुन इंद्रायणी तीरी विश्वंभराच्या घराजवळ मोठ्या समारंभाने मुर्तिची स्थापना करुन देऊळ बांधले.
🪔
विठोबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचा मुलगा बोल्होबा! बोल्होबाचा आणि कनकाईचा चाळीस वर्षानंतर झालेला पुत्र म्हणजेच तुकोबा, आपले तुकाराम महाराज!
🪔
विश्वंभर व त्यांची बायको आमाबाई ह्यांना हरी व मुकुंद असे दोन पुत्र होते. त्या दोघांनी चंदीचंदावरकरांचे पदरी नोकरी धरुन पराक्रमाने सरदारकी मिळवली. विश्वंभर मरण पावल्यावर पुत्रांनी आमाबाईला व कुटुंबाला चंदीचंदावरला नेले. पण तीचे मन देहुकडेच लागले होते. पुढे परचक्र येऊन लढाईत दोघेही ठार झालेत. दोन्ही सुनांपैकी एक गर्भवती होती. तीला विठोबा नांवाचा मुलगा झाला.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-२
🪔
बल्होबांना तीन मुलं, सावजी, तुकाराम, कान्होबा! सावजीचा पुर्वीपासुनच वैराग्याकडे कल होता. धाकटा कान्होबा पुढे तुकारामाचा शिष्य झाला. तुकोबांचे मुळ पुरुष विश्वंभर यांनी देहुस आले ते केवळ भक्ती व जिवंत धार्मिक भावना यांच्या बळावरच ! त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पन करुन सामाजासाठी राष्टभक्तिचा मार्ग मोकळा करुन दिला. मागील सहा पिढ्यांचा धार्मिक कमाईचा वारसा बोल्होबा मोरे यांना मिळाला.
🪔
बोल्होबांची वडीलोपार्जित खरी मिरासदारी विठ्ठल भक्ती तुकोबांना मिळाली. त्यांची पत्नी कनकाईचीही भक्ती उत्कट होती.
🪔
अशा या महान आईबापांनी तुकाराम महाराजांना जन्म दिला म्हणण्यापेक्षा महाराष्टधर्म! मानवधर्म, भक्ती, त्याग, वैराग्य व महाराष्टाचे भाग्यासच जन्म दिला असे म्हणणे संयुक्तीक होईल. महाराष्टाचा नवा मनु जन्मास आला. त्यावेळी महाराष्टाची राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थीती मृतप्राय होऊन तीला घाण येऊ लागली होती.
🪔
महाराष्टाची बहुसंख्य जनता गुलाम होते. उच्चनिचतेचे शिखर गाठल्याने हिंदु समाज विस्कळीत झाला होती. अशी सर्व परिस्थिती सुधारण्यासाठीच त्यांचा जन्म झाला म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
🪔
तुकोबांच्या जातीवरुनही त्यावेळी बराच हलकल्होळ माजला होता. जातीजातीतील विषमता त्यांच्या मनाला फार डाचत असे. विठोबाची कास धरल्याने जातकुळीचा भेदभाव नष्ट होतो हे त्यांनी पुनः पुनः सांगीतले. पण त्यावेळी जातीजातीतील द्वेष, मत्सर नीट लक्षांत घेतल्याशिवाय त्यांच्या अभंगाचे मर्म कळणार नाही.
🪔
वास्तविक तुकोबांचे मोरे घराणे देशमुखी, वतनदारीचे, पण त्यांचा वाण्याचा धंदा असल्यामुळे त्यांना शुद्र समजत होते. त्यांनी महप्रयासाने अभंग रचना केली. या अभंगामुळे समाजाचे खरे हित होणार होते पण वाघोलीच्या रामेश्वर भटजींनी सर्व अभंग नदीत खोलवर बुडवले. हेच त्यावेळी धार्मिक स्वातंत्र्य होते का?
🪔
महाराजांची खरी योग्यता जातीवर नसुन निर्मळ भक्ती, सत्याचारण, अहिंसा, हीन-दीनांबद्दलची जागती कळवळ, भागवत धर्माची द्वारे सर्वांसाठी खुली करणे,
🪔
उच्चनिचतेची कृत्रिमता गाडणे, रुढीच्या दास्यातुन सर्वास मुक्त करणे, वर्णाश्रमधर्माबाबत उघड बंड करणे, परधर्मियाच्या धार्मिक आक्रमणास अटकाव करणे आणि महाराष्टातील बहुसंख्य लोकात चालु काळाबद्दलची जाणीव उत्पन्न करणे, वगैरे राष्टोध्दाराचा बाबींवर त्यांचा भर होता.
🪔
अशा एकंदर महत्वाच्या गोष्टींमुळे महाराष्टातील आबालवृध्दांच्या ह्रदयात कायम ठाव करुन असेल, तोपर्यंत मानवी मन हे धर्म व भक्तीस बांधील राहिल आणि इतिहास जिवंत राहिल. महाराष्टाच्या ह्रदयात तुकाराम महाराजांची जागा कायम राहील.
🪔
तुकोबा हे व्यापकपणे चहुवर्णातीत होते कारण ते ब्रम्हनिष्ठ होते.
🪔
ब्रम्ह जाणे तो ब्राम्हण !
🪔
रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग,
अंतर्मन व बाहेर जनांशी युध्द करुन दोहोंवर जय मिळवला म्हणुन क्षत्रिय!
संताचा उदीम उपदेशाचा, भक्तीप्रेमाचा देवघेवचा व्यापार जन्मभर केला म्हणुन वैश्य! आणि पांडुरंगाची, जनता जनार्धनाची त्यांनी निष्काम भावनेने सेवा केली म्हणुन शुद्र ठरतात. बरं ते चहुवर्णाच्या पलीकडे गेले होते. स्वानुभव सुर्यापुढे. सारेच विचार तुच्छ ठरतात
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-३
🪔
बोल्होबा मोरे संसारातील सर्व व्यवहार अगदी दक्षतेने करीत असत, परंतु त्यांत ते गुंतलेले नव्हते. कारण संसारापेक्षा विठ्ठलभक्तीस विशेष महत्व देत. विश्वभरांच्या भक्तीमुळे देहु गावास क्षेत्राचे महात्म्य प्राप्त झाले. त्यांनी लावलेला भक्तीरुप वृक्ष त्यांच्या नंतरच्या सर्व पिढ्यांनी वाढविला. बोल्होबा पुर्वजांच्या मार्गाचा अवलंब वाढत्या प्रमाणांत करुन पंढरपुरची आषाढी व कार्तिक वारी नियमाने करणे, घरातल्या मुर्तिची पुजाअर्चा करणे, भागवतधर्मीय संताच्या अभंगवाणीचा भजनाव्दारे प्रसार करणे वगैरे धार्मिक बाबतीत त्यांचा बराच वेळ जात असे. संपत्ती वाढविण्यापेक्षा विठ्ठल भक्तीची वाढ जास्त कशी होईल याकडेच त्यांचे विशेष लक्ष असे.
🪔
शेतीवाडी, धनदौलत यापेक्षा विठ्ठलभक्ती जास्त उपयोगी पडेल असं त्यांना वाटे. त्यांच्या या उच्च ध्येयास सर्वतोपरी सहाय्यकर्ती अशीच गुणवती पत्नी लाभली होती. कनकाई आपल्या नवर्याप्रमाणेच संसारसुखापेक्षा परमेश्वर भक्तीसच जास्त महत्व देई. संतवचनाप्रमाणे बोल्होबा मोरे प्रपंचात अगदी सावध होते. मालकीचा वाडा, महाजनकीचे उत्पन्न, किराणामालाचे दुकान, पुरेशी शेती व सावकारी अश्या गोष्टींकडे कर्तव्य म्हणुन काळजीपुर्वक लक्ष देत. भक्तीच्या नावाखाली परक्याची एक दमडीही नको हे महान पथ्य सांभाळुन पुढील पिढीने हाच आदर्श ठेवला. त्यांच्या निर्लोभ वागण्यामुळे समाजात त्यांना चांगला मान होता. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे तुकोबाचे लग्न लहानपणीच रमाबाई बरोबर झाले. पण तीला दम्याचा त्रास असल्यामुळे, त्यांचे दुसरे लग्न पुण्याच्या गुळबे या श्रीमंत सावकाराने आपली मुलगी जिजाबाईचे लग्न उत्तमप्रकारे लावुन दिले.
🪔
बोल्होबांचा थोरला मुलगा साबाजीची पत्नी वारल्यामुळे त्याच्या लग्नासाठी प्रयत्न केले पण या जन्मत्यागाने लग्नास नकार देऊन उभे आयुष्य भक्तीत घालवणे हेच ध्येय होते. कांही दिवसांनी त्याने कोणासही न कळू देता गृहत्याग करुन स्वतःच्या अस्तीत्वाचा कुणालाही थांगपत्ता लागु दिला नाही. पुत्रवियोगाने बोल्होबा संसारातुन विरक्त होऊन भक्तीसंस्कारांत चांगलेच रमले. याचा परीणाम तुकारामावर होऊ लागला. बोल्होबाने संसाराची जबाबदारी तुकारामावर सोपवुन स्वतः परमेश्वर भक्तीत मग्न झालेत.
🪔
अल्प वयातच संसाराची जबाबदारी तुकोबा आनंदानं पार पाडीत होते. वडीलांचे संसारातुन पुर्णपणे निघालेले मन आणि आईचा पुत्रवियोगाचा जिवंत उमाळा पाहुन तुकोबांचे संसारात मन रमेना...! आईबापांची वाढत्या प्रमाणांतील भक्तीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन दिवसेदिवस वाढ होऊ लागली.
🪔
तुकोबांच्या संतपणाचा, भक्तीचा , श्रेष्ठतेचा पाया मातृभक्तीतच होता. त्यांच्या ठीकाणी जाज्वल्य स्वरुपात भक्ती निर्मान करणारी त्यांची माता कनकाईच होती. तुकोबा गर्भात असतांना त्यांचेवर श्वासाबरोबर भक्तीची पाखर घातली. तान्हेपणी स्तनांतुन त्यागरुपी दुध पाजुन पवित्र असे वैराग्याचे संस्कार घडविले.
🪔
त्यामुळेच हा जगद्वंद्य महात्मा निर्माण होऊ शकला. एक माता जे करु शकेल ते हजार शिक्षकास गुरु म्हणुन मिरवणारांस अशक्य आहे. भक्त पुंडलीकाने पंढरपुरी मातृपितृ भक्तीने विठोबास उभे करुन समाजास आईबापांच्या सेवेचा मार्ग दाखविला. तुकोबांच्या अभंगावरुन ते निःसीम मातृपितृ भक्त होते हे दिसुन येते.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
९/११/२०, सकाळ ११:०१ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-४
🪔
तुकारामांचा जन्म इ.स. १५८८ मधे झाला. १६२७-ते ३० मधे महाराष्टात भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी ते ४२ वर्षाचे असावेत. त्यांचा विपरीत काळ येणे आणि त्यांची साधु व कवि होणे ह्या दरम्यान ज्या गोष्टी घडुन आल्यात त्या त्यांनी आत्मचरित्रपर अभंगात सांगीतल्यात. त्यांच्या कवितेचा निषेध होणे, वह्या बुडवणे या गोष्टींचा उल्लेख केला. दुष्काळ पडल्यानंतर व्यवहारात तुट पडत गेली. दुष्काळाने घरांतील पुंजी संपल्यावर, दुकान नीट चालेनासे झाल्यावर व्यवहाराचा नीट जम बसत नाही असे पाहुन त्यांनी कोकणात जाऊन मीठ, मिरची, गुळाचा व्यवहार केला, परंतु त्यातही तुट येत गेली. नंतर कर्ज काढुन मीठ व गुळ खरेदी करुन बालाघाटास गेले. आलेल्या पैशातुन ञृणग्रस्त ब्राम्हणास सोडवले.
🪔
तुकोबांचे मन संसारात रमेनासे होऊन इश्वरभक्तीकडे अधिक लागले. ह्याच सुमारास त्यांना शेताची राखण करण्याचे काम मिळाले, पण राखण करीत असता ते भजनांत इतके दंग, रंगुन जात की, तिकडे पक्षी दाणे लुटुन नेत. हे पाहुन शेतमालकाने पंचायतकडे फिर्याद केली. चौकशीअंती तुकोबाकडुन नुकसान भरपाई म्हणुन खत द्यायला लावले. शेताची कापणी केल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक धान्य आल्याने तुकोबाला देऊ केलेले धान्य त्यांनी नाकारले. यावरुन त्यांचा बाणेदारपणा दिसुन येतो.
🪔
तुकोबांच्या पुर्वजांनी देहुला बांधलेले देऊळ मोडकळीस आले म्हणुन त्यांनी स्वतः कष्ट करुनही जीर्णोध्दराचे काम एकट्याने होऊ शकत नाही हे पाहुन त्या शेतकर्याने तुकोबाच्या वाटणीचे धान्य विकुन आलेल्या पैशातुन देऊळ तयार झाले. उद्यापन करुन ब्राम्हण भोजन घालण्यासाठी त्यांचे जवळ पैसे नव्हते, पण इश्वरी लीला अगाध आहे, त्या शेतमालकाला ऊपरती झाली आणि राखणीसाठी कबुल केलेले धान्य विकुन कार्य पार पाडले. देवळाचा जीर्णोध्दार झाल्याचा त्यांना अतिशय आनंद झाला.
🪔
तुकोबा आता परमार्थपर वाडःमयाचा जारीने अभ्यास करुन भजन, पुजन, किर्तन करीत होईल तेवढा परोपकारही करु लागले. कोणाच्या कामात मदत कर, भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, गांजलेल्याचा परामर्श घे, व्याधीग्रस्तांना औषधपाणी, अशी नाना प्रकारची कामे करत शरीर कष्टवुन घेत.
🪔
तुकोबांचा व्यापार उद्दीम अगदी बसला. संपन्न स्थितीत अब्रुत राहणारे ते अगदी तिरस्कृत अशा वेड्यापिश्याच्या स्थितीत पोहोचले. पत राहिली नाही, मानमान्यता नाहीशी झाली. त्यांची गाढवावरुन धींड सुध्दा काढण्यांत आली. ऐहिक स्थितीत असे परिवर्तन होत असतांना मात्र परमार्थात पुढे पाऊल पडत होते.
🪔
जगाविषयी व जगाच्या बेपर्वाईने उदासीनता अंगी बाणु न देता द्वेष, मत्सर, लोभ इत्यादी विकारांनी कलंकीत होणार्या प्रपंचात, परिभ्रमण करणार्या संसारात धृवाप्रमाणे अचल असणार्या निरंजन व विशुध्द अशा परमेश्वराकडे त्यांचे लक्ष स्थिरावत गेले.
🪔
तुकोबाचे आईवडील परमधार्मिक असल्यामुळे ते आधीपासुनच भाविक, सदाचार संपन्न होते. संसार सांभाळुन धार्मिक ग्रंथाचे पठण, भजन पुजनांत वेळ घालवित असत. आईबाप निवर्तले, भावजयीचे मरण, भाऊ निघुन गेलेला, दिवाळे निघाले या सर्व वैतागाने संसाराचा वीट येऊन त्यांना एकांतवास अधिक प्रिय वाटु लागला. घरदार सोडुन रानावनात भजनांत दंग होऊन बसु लागले. अंतःकलह आणि अशांती जोरावली. आणि भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
९/११/२०, सकाळ ११:०१ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-५
🪔
देहुमधील समताधर्म फडकावणार्या धर्मवीराकडे अखिल जगाने पहावे असा दिवा कनकाईने पाजळविला, तर पारततंत्र्यांच्या जोखडातुन मुक्तता व्हावी, शेकडो वर्षे परसत्तेचे तुफान नष्ट व्हावे, स्वातंत्र्याची ज्योत महाराष्टात प्रथम पेटविण्याचे श्रेय जिजामातेने शिवबासारखा पुत्र देऊन घेतले.
*जिच्या हाती पाळण्याची दोरी । तीच जगाते उध्दारी।।*
🪔
तुकाराम महाराज आणि
छ. शिवाजी महाराज दोघेही मातृभक्त होते. खरं पाहता तुकोबांचा विपरीत काळाच
🪔
काळाचा आरंभ दुष्काळापासुन झाला नाही तर त्यांचे वडील बोल्होबा मरण पावल्यापासुन झाली. लवकरच त्यांची परमवत्सल माता मरण पावली. व्यापार धंदा बसल्यामुळे आधीच्या दुखण्याने त्यांची प्रथम पत्नी रखमाबाईची प्रकृती क्षीण असल्यामुळे अश्या परिस्थीतीत ती टिकाव न धरु शकल्याने मरण पावली. बायको, मुल मेल्याने मायापाशांतुन ते मोकळे झाले. संसाराचे गाडे नीट चालत नाही असे पाहुन भामनाथ पर्वतावर जाऊन ते भजन व हरीनामस्मरणांत मग्न झाले. भजन पुजन, नामस्मरण, ग्रंथाध्यायन, किर्तन, मनन ध्यान इत्यादिकांत वेळ घालवु लागले. जवळपास असणार्या आळंदी वगैरे तिर्थयात्रा करीत.
🪔
अमेरिकन तत्ववेत्ता इमर्सनच्या म्हणण्यानुसार *'जोपर्यंत मनुष्यावर संकट येत नाहीत तोपर्यंत त्याच्या अंगी असणार्या गुणांचा विकास होत नाही'*
🪔
संकटे म्हणजे उन्नतावस्था प्राप्त करुन देणारी साधने आहेत. ज्याच्यावर देवाचे प्रेम असते त्याच्यावर संकटे आणुन देव त्याला तावुन सुलाखुन त्याची परिक्षा घेत असतो. भागवताचे प्राकृतात निरुपण केल्याबद्दल, आणि अभंगाद्वारे वेदांताचा उपदेश केल्याबद्दल तुकोबाचा अतिशय छळ करण्यांत आला. धर्मतत्ववेत्तांचे ज्ञान व्हावे व इश्वरस्वरुपाची ओळख व्हावी, ज्या देवाची भक्ती करतो त्याचे यथार्थ रुप समजावे, आणि हे ज्ञान वेदांतच आहे हा दृढ समज असल्यामुळे वेदांचा ठाव घेण्याची त्यांना उत्कंठा होती. परंतु हा अधिकार आपल्याला नाही म्हणुन ते दुःखी होते.
🪔
तुकोबा वेदांती नव्हते, पंडीत नव्हते. त्यांनी पंडीतांप्रमाणे वाद केले नाहीत, तरी अनेक व्यावहारीक दृष्टांत देऊन अद्वैत मनाचे उत्तम रितीॅ खंडन केले. भेदभाव नाहीसा करावा, हे त्यांचे आरंभापासुन ध्येय होते. सर्व सृष्टी परमेश्वराची आहे, परमेश्वर भूतमात्रात आहे, विश्वव्यापक आहे. यासाठी सर्वांविषयी समभाव ठेवुन कोणाचा मत्सर, द्वेश, इर्षा करु नये. त्यांची भक्ती म्हणजे प्रेमभक्ती, सख्यभक्ती होती. देवांचे भजनपुजन,जनी जनार्दनाची आणि भूतमात्राची सेवा करत देवाशी समरस झालेत.
🪔
वैराग्य प्राप्त झाल्यावर त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, अपनिषदे अभ्यासली. द्वेत-अद्वैतावर कांही अभंग रचना केली. नंतर ग्रंथावलोकन कमी होऊन भजन, किर्तन, मनन, ध्यान करुन देवाशी समरह होण्याचा जो आनंद मिळतो तो भक्तांच्या भजन किर्तनांत आहे, ज्ञान्यांच्या आत्मस्थितीत नाही.
🪔
महारांजास वैराग्य उत्पन्न होण्याचे मुख्य कारण त्यावेळी परसत्तेने गरीब जनतेकडे दुर्लक्ष करुन चालवलेले भयंकर हाल ! जनतेच्रा दुःखास अनुसरुन परमेश्वरास जागे केल्याशिवाय, त्याला प्रसन्न केल्याशिवाय दुसरा उपाय नाही हे त्यांना उमगले.
🪔
संसारी जीवनास स्वहस्ते त्यागरुपी अग्नी लावुन जनहिताचा खरा मार्ग शोधला. परहितासाठी नवीन जीवन धारण केले.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
९/११/२०, सकाळ ११:०१ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-६
🪔
तुकोबांना संसारी सुख नाही म्हणुन ते भक्त झाले नाही, तर पुर्णविचारांती परसेवेसाठी त्यांनी वैराग्याची कास धरली. त्यांचा त्याग, भक्ती व असामान्य साधुत्व यांची प्रभा महाराष्टभर फाकली. त्यांना अनेक प्रकारची मदत, खुद्द छ. शिवाजी महाराजांनी त्यांच्या योगक्षेमेसाठी मोठी देणगी पाठवली, पण या महात्म्याने साधी नजर सुध्दा फिरविली नाही.
कारण "बुडती हे जन पहावेना डोळा । म्हणुन येतो कळवळा तारावयासी ।।" याच तत्वासाठी उभे आयुष्य परमेश्वरभक्ती व जनहितातच खर्च करण्याचा निर्धार केला. समाजाच्या निरंतर उपयोगासाठी जी अनमोल अभंगवाणी करुन ठेवली त्या शक्तीचे मुळ ज्या दिवशी संसार सोडला त्याच वेळी हाती लागले.
धर्म रक्षावयासाठी ।
करणे आटी आम्हासी ।। वाचा बोलो वेदनीती ।
करु संत केले ते ।।
🪔
तुकोबाची पत्नी जिजाई हिच्याबद्दल ती खाष्ट आहे म्हणुन प्रचार होता. पण ती का संतापत असे ? कारण तीला घर चालवावं लागे आलेल्या अतिथीचं पहावं लागे, आणि तुकोबाचे घराकडे अजिबात लक्ष नव्हते. वरुन दिनदुबळ्यांना, आल्यागेल्यांना घरांत जे असेल ते वाटुन देण्याची प्रवृत्ती, त्यामुळे तीची फारच ओढातान व्हायची ! तीला तुकोबांची योग्यता कळल्यावर ती त्यांची एकनिष्ठ शिष्या झाली.
🪔
वास्तविक जिजाई ही पुण्यांतील एका धनाढ्य सावकाराची मुलगी ! बापाने थाटांत लग्न लावुन दिले. सासरची देखील सांपतिक स्थिती चांगली होती. पुढे वाईट दिवस येऊन सासरची संपन्नावस्था ढासळली.सासु सासरे, जाऊ मृत्युमुखी पडलेत, दीर घर सोडुन गेला, धंदा बसला. संपत्ती नाहीशी झाली, तरी ती डगमगली नाही की, माहेरी जाऊन राहिली नाही. स्वतः जामीन राहुन तुकोबांच्या धंद्याला सहाय्य व प्रोत्साहन दिले. परंतु तुकोबांचा भोळसटपणा व कनवाळुपणामुळे तीला अपयश येत गेले.
🪔
तुकोबा आणि जिजाई यांचे आराध्य दैवत, उपासनेचा मार्ग भिन्न असल्यामुळे त्यांच्यांत मतभेद होत असे. तुकोबा विठोबाचे भक्त होते तर जिजाई मेसाई, जाखाई, जोखाई, राहु केतु शनिदेव वगैरे जिजाईचे उपास्थे होती. तीचा समज होता की, विठोबा हा घरघेणा देव आहे. तो आपल्या भक्तांना सुखाने नांदु देत नाही. संसाराची राखरांगोळी करणार्या विठ्ठलाविषयीची तेढ वाढु लागल्याने विठोबाला सोडुन द्या म्हणुन तीचे सारखे टुमणे असे. तुकोबा एरवी धीरगंभीर व शांत स्वभावाचे, परंतु प्रत्यक्ष पत्नीनेच विठोबाची नालस्ती करावी हे त्यांना खपत नसे.
🪔
संसारांत जी संकटे येतील त्यांना धेर्याने तोंड देऊन केवळ देवावर भार ठेवुन तीने निश्चिंत असावे, निष्काम धर्माचे आचरण करावे असे तुकोबांना वाटे, परंतु कर्मठपणांत मुरलेल्या, लौकीक धर्मात वाढलेल्या साधारण स्रीस हे असिधारे प्रमाणे कठीण व्रत आचरणांत आणणे सोपे नव्हते.
🪔
तुकोबा पत्नीस उपदेश करुन म्हणायचे क्षणभंगुर सुखाचा ध्यास न धरतां परमेश्वर प्राप्तीची आयास केला व त्याच्यावर भार टाकला तर तो भक्ताची ऊपेक्षा कधीच करत नाही. याचा जिजाईवर परिणाम होऊन ती त्याप्रमाणे तीच्यावर परिणाम होउ झाल्यामुळे तीची आध्यात्मिक उन्नती झाली.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
९/११/२०, सकाळ ११:०१ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-७
🪔
विश्वंभरबोवापासुन तुकाराम महाराजांच्या घराण्यांतील सर्वांना भागवत धर्मीय संताबद्दल अत्यंत आदर होता. महाराजांनी संसारत्याग करुन भक्ती मार्ग धरला. परंतु बायको-पोरांची ओळख विसरले नाही. फक्त ते गुंतुन राहिले नाही. संसारात असतांनाच त्यांच्या भक्तीमुळे व आचरणामुळे परमेश्वर त्यांच्या घरी भेटला. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुळ पुरुषाने खर्या भक्तीच्या जोरावर पंढरपुरच्या विठोबास देहुस येण्यास भाग पाडले. प्रत्येक अवतारी पुरुष हा स्वतः पुर्वजांच्या प्रतिनिधीरुप असतो.
🪔
देहुगांवचे क्षेत्रमहात्म्य वाढते असल्यामुळे आसपासचे लोक येऊन इंद्रायणीत तिर्थ म्हणुन स्नान करीत, हे पाहुन त्यांच्या धार्मिक भावना उचंबळुन येत. आपल्या पुर्वजांनी इथे भक्तीचा वृक्ष लावुन भक्तीमार्गाने जाण्यासाठी मोठी कमाई करुन ठेवल्याने आपण त्याच मार्गानेच गेले पाहिजे असा त्यांनी निश्चय केला.
🪔
संसाराचा सारा भार परमेश्वरावर टाकुन भक्ती हेच आयुष्याचे मुख्य ध्येय ठरविले. जिजाऊने त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न वाया गेला. त्यांचा निश्चय कोणीच फिरवु शकलं नाही. घरांत राहिल्याने मन विचलीत होत असल्यामुळे दिवसा गृहत्याग करुन सायंकाळी घरी यावे. रात्री भजन करावे नंतर एखादा दुसरा दिवस रानांत मुक्काम करावं. कांही दिवसांनी संसाराबद्दल पुर्ण उदासीन झाले.
🪔
सर्व संगी वीट आला !
तू एकला आवडसी ।
दिली आता पायी मिठी ।
🪔
जगजेठी न सोडी ।।
🪔
दुःख वांदडी आहे हा संसार।
येके सार भगवंता ।।
🪔
महाराज आपल्या ध्येयाचा मार्ग आक्रमु लागले. ते पंधरा दिवस घरी न आल्याने जीजाईला काळजी वाटु लागली. कान्होबांनी त्यांना नेहमीच्या सर्व ठीकाणी शोधले पण न सांपडल्याने निराश होऊन घरी परतले. तेवढ्यात माहिती मिळाली की, ते भांडारा डोंगरावर आहेत. हा डोंगर देहुपासुन तीन मैलावर आहे. तीथे पुर्वीच्या त्यागी लोकांच्या गुहाही आहेत. तिथुन महाराजांना घरी चलण्यासाठी कान्होबाने हट्टच धरल्यामुळे गावाजवळच्या इंद्रायणी नदीच्या पैलतीरी येऊन बैठक मारली. आणि कान्होबास त्यांनी सावकारीची खतपत्रे आणण्यास सांगीतले.
🪔
तुकाराम कान्होबास म्हणाले ही खतं संसारांतील पाश असल्यामुळे सर्व इंद्रायणीस अर्पन करतो. त्यावर कान्होबाने हरकत घेतल्यावर त्याच्या हिश्शाची निम्मी खतं देऊन बाकीची खतपत्रे स्वहस्ते इंद्रायणीच्या पाण्यांत बुडवली आणि निर्विकार मनाने तिथेच बसुन राहिलेत
🪔
ही हकीकत जीजाईला कळल्यावर खतपत्रे पाण्यांत गेल्याचे दुःख न करता महाराज सांपडले याचाच आनंद झाला. तीने त्यांना घरी आणले.
🪔
सावकारीची खतपत्रे पाण्यात टाकणे म्हणजे "संसाराचे पिंडदान स्वहस्ते पिंडदान स्वहस्ते करणे होय"
🪔
तुका म्हणे जो या संसारांत रुसला ।
तेथे ठाकीला सिध्दपंथा ।।
🪔
महारांजांनी संसाराचे पिंडदान केल्यावर इश्वरप्राप्तीसाठी भक्ती हेच औषध घेऊन द्रव्यास स्पर्श न करण्याचे पथ्य सांभाळल्यामुळे त्यांच्या हातुन महाराष्टाच्या उध्दाराचे महान कार्य घडले.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-८
🪔
तुकोबांनी वैराग्य धारण केल्याने देहुचे महत्व वाढले. जनता देहुक्षेत्री महारांजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी शिवाजी महारांजाचे वास्तव्य पुणे प्रांतांत होते.
🪔
राष्टममाता जिजाबाईंनी शिवाजी राजेंना राष्टप्रेमाबरोबरच धर्मप्रेमाचे धडे दिले होते. त्यांना देहुचे महात्म्य अनेकवेळा सांगण्यांत आल्याने ते वरचेवर तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येऊन उपदेशाचा फायदा घेत. अशा श्रेष्ठ संताची कांही तरी सेवा घडावी म्हणुन सोन्याच्या मोहरा घेऊन करंजईच्या बेटावर एका दगडी शिळेवर नामस्मरणांत तल्लीन असलेल्या तुकोबासमोर ठेवले. त्यांचे भजन आटोपल्यावर समोर ताटभर सोन्याच्या मोहरा पाहुन त्यांना अतिशय दुःख ते पुनः त्या ताटाकडे व शिळेकडे न पाहता निघून गेले. भजन करण्याची पवित्र शिळा द्रव्याच्या स्पर्शाने विटाळली परत त्या शिळेला त्यांनी स्पर्शही केला नाही.
🪔
तुकाराम महाराज भजनासाठी कोठेही रानांत बसत. त्यांना खाण्यापिण्याचीही शुध्द नसायची.
🪔
त्यांची पत्नी जीजाई त्यांच्या आधी कांही न खाता पिता उपाशीपोटी त्यांचे जेवण घेऊन त्यांना शोधत दिवसभर रानांत भटकत असे. त्यासाठी तीने संसाराकडे दुर्लक्ष केले. पोरांबाळांच्या होणार्या अव्यवस्थेची पर्वा केली नाही.
🪔
संसाराचा गाडा हाकण्यास तीला कोणाचीही मदत नव्हती. सुरुवातीला त्यांची चोहोकडुन झालेली उपेक्षा स्वतःच्या देहाची बेपर्वाही अशा वेळी जर जिजाईने दुर्लक्ष केले असते तर महाराज कदाचित संत होऊ शकले नसते. अशावेळी या मातेने पतिव्रता धर्माच्या ज्योतीवर महाराजांस त्यांच्या भावी मार्गाने जाण्यास खरी मदत केली.
🪔
जिजाई बद्दल बर्याच आख्यायिका प्रसिध्द आहेत की, ती खाष्ट, खट्याळ, रागीट, कर्कश, तोंडाने फटकळ होती, पण हे खरे वाटत नाही. कारण खतपत्रे तुकोबांनी नदीत बुडवण्यासारखी दुसरी मोठी चुक असुं शकेल ? पण त्या माऊलीने शब्दानेही त्यांना दुखवले नाही की, राग धरला नाही. दुष्काळ संपल्यावर तुकोबांनी पुर्ण लक्ष संसारातुन काढल्यामुळे जिजाबाईची किती ओढातान झाली असेल? तरी ती पतिनिष्ठ स्री नवर्याची प्रत्येक आज्ञा तंतोतंत पाळीत असे.
🪔
घरांत गाडग्यामडक्याचा संसार, मुलंबाळं ऊघडी, अशी तुकोबांच्या संसाराची उडालेली दुर्दशा पाहुन शिवाजी महाराजांनी मदत पाठविली परंतु एवढी विपन्न अवस्था असुनही तुकोबांच्या आज्ञेने तीने सर्व परत पाठविले. फाटक्या संसाराला त्या परधनाचा विटाळ होऊ दिला नाही.
🪔
संसारात प्रतिदिनी निर्माण होणारी संकटे, मुलांबाळांची आबाळ, तुकोबांची काळजी, त्यांच्या आज्ञा व्रतासारख्या पाळणे अशा अनेक त्रासांमुळे एखादेवेळी सात्विक संताप होणे अशक्य नाही! पण ती खाष्ट, कर्कश, फटकळ, वगैरे विशेषणें लावणे म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखे नाही का ?
🪔
महाराजांच्या हस्तलेखातील वही ( चोपडी) पारगांवकरांनी मागीतल्यावर त्यांना नकार मिळाल्यामुळे त्यांच्या घरच्यांवर त्यावेळच्या कलेक्टरांकरवी दबाव आणला होता, पण ही वही आमच्या घराण्याचा सन्मान, प्रसाद असुन आमच्या पुर्वजांनी जिवापाड जपलं आहे, ही वही या घरांतुन जाणे म्हणजे घराण्याचे सर्वस्व गेल्यासारखे होईल असे म्हणुन तुकोबांच्या वंशजाने कलेक्टरलाही जुमानले नाही.
🪔
तुकाराम महाराज यांचे एकंदर अवतार कार्य, महाराष्टासाठी केलेली धार्मिक, सामाजिक जागृती अशा अशा अनेक कार्यामुळे महाराष्ट त्यांचा निरंतर ञृणी राहील. अशा या थोर महात्म्याच्या धर्मपत्निविषयी साधी कृतज्ञताही कोणी दाखविली नाही यासारखे दुर्दैव कोणते ?
🪔
क्रमशः
🪔
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-९
🪔
एकदा एका पाटलाने तुकोबांना घरच्यासाठी ऊसाचा भारा दिला. ऊस घरी आणता आणता रस्त्यात भेटणार्या मुलांना वाटत वाटत फक्त एक ऊस घरी घेऊन आलेत, ते पाहुन संतापाने जिजाईने तो ऊस त्यांच्या पाठीत जोराने मारल्याने ऊसाचे तीन तुकडे झाले अस नमुद आहे, पण ही अगदी असंभव गोष्ट वाटते. खेड्यात, जुन्या संस्कारांत वाढलेल्या, अतिशय धार्मिक वृत्तीची पतिनिष्ठ, पतीसाठी वाटेल तेवढे हाल अपेष्टा सहन करणार्या जिजाई कडुन अस घडण्याची कल्पनाही करु शकत नाही, अगदी अशक्य आहे.
🪔
खरी गोष्ट अशी होती की, तुकौबांनी राहिलेला एकच ऊस जिजाईच्या हाती दिल्यावर पुर्ण मोळीतुन एकच ऊस घरी आणला हे पाहुन एवढा तरी कशाला आणला म्हणुन सात्विक संतापाने ऊस जमीनीवर आपटला त्याचे तीन तुकडे झाल्याचे पाहुन तुकोबा म्हणाले "वाहवा ! तु बरोबर वाटणी केली !
🪔
तुकाराम महाराजांच्या अंतःकरणांत भक्ती आणि वैराग्याची कोवळी कोंब नुकतेच जन्मास येण्याची सुरुवात झाली होती, अशावेळी जिजाईने स्रीधर्मास अनुसरुन आपल्या देहाचे कांटेरी कुंपन करुन त्यांचे रक्षण करुन ते कोंब वाढीस लावले, इतकेच नाही तर त्या कोंबाचा मोठा वृक्ष बनवण्यासाठी अपार कष्ट केले, अशा या थोर माऊलीच्या एकंदर पतिनिष्ठेचे महत्व न ओळखणे म्हणजे तीच्यावर अन्यायच नाही का ?
🪔
महाराज आपल्या अभंगात म्हणतात "पतिव्रतेची देवाघरी सभा"। सर्वस्वाचा त्याग करुन निरहंकार वृत्तीने गिरिकंदात राहणे एकवेळ सोपे, पण पतिव्रताधर्म पाळणे महाकठीण व्रत आहे. तीने कायावाचा मनोभावे पतिसेवा केल्यामुळे तीला वाचासिध्दी प्राप्त झाली असावी हे पुढील ऊदाहरणावरुन लक्षात येईल.
🪔
देहुपासुन कांही अंतरावर चिंचवड गांव आहे. तुकोबांच्या काळी तेथे मोरया गोसावी( चिंतामणी देव) हे महान सिध्दीसामर्थ्य असलेले गणपती भक्त म्हणुन त्यांची प्रसिध्दी होती. त्याच काळी पुण्यात अनगडशहा मुसलमान इश्वरभक्त फकीर मोठे सिध्दीप्राप्त अवलिया होते. परीक्षा घेण्याच्या ऊद्देशाने ते चिंतामणींच्या वाड्यासमोर येऊन कटोराभर भिक्षा मागीतली असता धान्याचे पेवेच्या पेवे त्या कटोर्यात ओतुनही कटोरा भरत नव्हता. चिंतामणींनी स्वतःच्या सिध्दीसामर्थ्याने कटोरा भरला पण तात्काळ रिकामा झाला हे पाहुन त्या अवलियाचे खरे सामर्थ्य ओळखुन वाड्यात बोलावुन त्यांचा सन्मान केला.
🪔
नंतर ते तुकाराम महाराजांचे साधुत्व व किर्ति अनगडशहाने ऐकल्याने त्यांचीही परीक्षा पहावी म्हणुन देहुला त्यांच्या घरी येऊन भिक्षेची आरोळी ठोकली. घरी आलेल्या कोणासही रिक्त हस्ते परत पाठवु नये हे जिजाबाईस महाराजांचे सांगणे ती तंतोतंत पाळीत असे, त्याप्रमाणे तीनं मुलगी गंगुला फकीराच्या कटोर्यांत पीठ वाढण्यास सांगीतले. गंगुने आपल्या चिमुकल्या हाताच्या ओंजळीने कटोर्यांत पीठ टाकतांच कटोरा भरुन पीठ खाली सांडु लागले. आश्चर्यचकीत होऊन तुकोबाला शरण गेले, शेवटचे दिवस देहुत राहुन तीथेच देहाचे विसर्जन केले.
🪔
कांही तपे, तपश्चर्या, योगसाधना करुनही चिंतामणी देवास फकीराचा कटोरा भरणे अशक्य झाले, त्यांचे ज्यांच्यापुढे सिध्दिसामर्थ्य लुळे पडले, तोच कटौरि जिजाईच्या नुसत्या शब्दाने भरला गेला, याचे मुख्य व महत्वाचे कारण तीने पाळलेल्या पतिधर्मात आहे.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१०
🪔
परमेश्वराचे नामस्मरण करुन प्रत्यक्ष प्राप्ती करुन घ्यावी या उच्च ध्येयासाठी बाह्यगोष्टीतुन सर्व प्रकारे मन काढुन लोकांचा सहवास शक्यतो टाळून जास्तीत जास्त रानावनांत एकांतात वेळ घालवू लागले. भामनगर डोंगरावर जाऊन परमेश्वराच्या भेटीचा निश्चय करुन नामस्मरणाच्या भक्तीयुक्त अंतःकरणाने भगवंतास आळवले. तो भक्तवत्सल तुकोबांच्या साध्या सरळ भक्तीने वश होऊन त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार झाला. त्यानंतर ते शरीरानेच राहिले पण मनाने व कृतिने वेगळ्या जन्मात गेले. त्यामुळेच त्यांच्याकडुन भागवत धर्म प्रसाराचे व समाजोध्दाराचे महान कार्य झाले.
🪔
सर्व संगपरित्यागानंतर त्यांनी अभंगाचे गाथे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवताचा अभ्यास, शक्य तेवढी पुराणे धुंडाळली. अंतःकरणाचे पावित्र्य, इश्वरभक्तीचे सहाय्य व जनहिताची खरी तळमळ यांची जोड मिळाल्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यामुळे समाजास मार्ग दाखवण्याचे कार्य करु लागले.
🪔
वर्णभेदाच्या विषारी विचारप्रणालीमुळे समाजात ऐक्य नवहते. जातीभेदाच्या चिखलांत समाज घट्ट रुतला होता. जातीची कृत्रिम उच्चनिचता धर्ममार्गात आडवी येत होती. इश्वर प्राप्तीचा मार्ग सर्वांना खुला नाही असे शास्राज्ञेच्या नांवाखाली उघड उघड सांगीतल्या जाई. तुकोबांनी समाजऐक्यासाठी व धर्मप्रसारास्तव वर्णाभिमानाच्या तटास अभंगवाणीचे सुरुंग पध्दतशीरपणे पेरण्यास सुरुवात केली. त्यामुळे भागवतधर्माची सत्य तत्वें झपाट्याने प्रसार पावु लागली.
🪔
वर्णाश्रमधर्माचा जुलुम, कर्मठांची कठोर वृत्ती याबद्दल प्रतिकाराची भावना समाजांत रुजू लागली. उच्चनिचतेचा कृत्रीम भेदभाव गाडला जाऊन समाज एकसुत्रात येऊ लागला. परधर्माची लागलेली आग विझुन नकली खरी खोटी धार्मिक तत्वे पारखण्याचे खरे साधन समाजास लाभले. त्यामुळे महाराष्ट जनता श्रृतिस्मृतीचा चक्रव्युह, कर्मकांडाचा तट, वर्णाश्रमरुपी काटेरी कुंपण यांच्यातुन सुटु लागली.
🪔
महाराष्टातील जनता नव्या दमाने, नव्या विचाराने भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेसे पाहुन कर्मठांस सहन होईना! कारण तुकोबांनी अभंगवाणीने खालच्या थरास हात घालुन संबंध महाराष्ट ढवळुन जागा केला.
🪔
महाराजांचे साधुत्व व किर्ती वाघोली येथील रामेश्वर भटांच्या कानी गेली. त्यांनी तुकोबांना बोलावुन, "तू शुद्र आहेस, अभंगात श्रृतीचा अर्थ स्पष्ट उमटतो म्हणुन यापुढे किर्तन करायचे नाही." अभंगाच्या सर्व वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यासाठी आणायला लावल्यात. रामेश्वर भट्टांनी वह्या डोहात बुडवल्यावर तुकोबांनी अन्नपाणी सोडुन देवाचा धावा सुरु ठेवून, शरीरधर्मास रजा देऊन तीथेच बसले. त्यांच्या आर्त हाकेला भक्तवत्सल धावुन आला. तेराव्या दिवशी बुडवलेल्या वह्या तरंगतांना दिसल्यात. त्या वह्या वाजत गाजत मंदिरांत आणुन ठेवल्यात.
🪔
देवाची स्तुती करतांना देवाची साऊली, माऊलीहुन मवाळ, चंद्राहुन शीतल, पाण्याहुन पातळ असा प्रेमाचा कल्होळ सुरु केला.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-११
🪔
पलिशेटी नावाच्या इसमाने आपल्या मिरासीच्या शेतांपैकी शिवगंगेचा तुकडा मंबाजी नांवाच्या ब्राम्हणास देऊन मठ बांधुन दिला. तीथे मंबाजी राहुन लोकांना मंत्र, गुरुपदेश करत असल्यामुळे शिष्य संख्या वाढली. परंतु तुकोबांच्या मार्गाचा प्रसार झाल्याने लोक मंबाजीला सोडुन तुकोबांच्या भजनी लागल्याने त्यांचा द्वेष करु लागला. एके दिवशी मंबाजीच्या मठातील बागेची एका म्हशीने बरीच नासधुस केली. दुसर्या दिवशी एकादशी. दर्शनाला येणार्या लोकांना काट्यांचा उपसर्ग होऊ नये म्हणुन तुकोबांनी ती वाट निष्कटंक केली. हे पाहुन मंबाजीच्या अंगाचा भडका उडाला. त्याने एका काटेरी काडी घेऊन तुकोबाला झोडपु लागला. दहा काठ्या त्यांच्या पाठीवर मोडल्या. तुकोबा देवाचे ध्यान व तोंडाने हरीनामस्मरण करत मुकाट्याने मार खात होते. शेवटी मंबाजी थकला पण तुकोबाची शांती ढळली नाही. मंबाजीकडुन त्यांना अनेक प्रकारे उपसर्ग होत होता.
🪔
पुढे त्यांची योग्यता सर्वांना कळुन आली. रामेश्वर भट्ट सारखे त्यांचे शिष्य बनले. खुद्द शिवाजी महाराज जीव धोक्यात घालुन त्यांचे किर्तन श्रवण करण्यांस येत असे. एकदा शिवाजी महाराजांनी तुकोबांना दिवट्या, छत्री, घोडे पाठवुन त्यांना बोलावले, पण ते गेले नाहीत. तुकोबांच्या हयातीतच त्यांचे अभंग जयराम स्वामीसारखे संत आपल्या किर्तनात म्हणु लागले. हा त्यांचा मानमरातब काय कमी होता ?
🪔
तुकाराम महाराजांच्या काळी महाराष्ट सर्व बाजुंनी अवनतीच्या खड्यात पंगु होऊन दीन बनला होता. अशावेळी त्यांनी भागवत धर्माची दारे सताड उघडुन सर्व जनतेस स्थीर व धार्मिक ऐक्य उत्पन्न करुन कार्यप्रवृत्त केले.
🪔
तुकोबांनी विठ्ठल हाच गुरु मानला. त्यांचे युध्दाचे शस्र दया, क्षमा, शांती, प्रेम, नम्रता, आत्मपरिक्षण आणि परमेश्वर नामाचे स्मरण ही शस्रे वापरुन रात्रंदिवस घनघोर युध्द करुन शत्रुंना जिंकले. शत्रुला पादाक्रांत करुन इश्वराला वश केले. उपदेश कोणाकडुनही घेतला नाही. विचारशक्ती आपली असावी, गुरुचा गुलाम होऊ नये, गुरु जर परमेश्वर प्राप्तीच्या आड येत असेल तर त्याला बाजुला सारावे अशी तुकोबांची शिकवण होती. गुरुंच्या नादी न लागता जो जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, आकाशी ह्रदयात आहे अशा एका देवाची कास धरावी. तुकोबांचे परमगुरु राघव चैत्यन्य, ज्यांचे पुर्वाश्रमीचे नांव राघव होते.
🪔
तुकोबांच्या काळी गुणी माणसांचे पीक होते. त्यांच्या संपर्काने कांही माणसे संत झालीत, त्यातील मुख्य तीन संत- रामेश्वर भट,ज्याने सुरुवातीला तुकोबांना छळले, वह्या डोहात बुडवल्या, २- कचेश्वर ब्रम्हे, आणि तिसरी बहिणाबाई. रामेश्वर भटाने तुकोबांना छळल्यामुळे अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा त्याला पश्चाताप होऊन डोळे उघडले, तुकोबांची योग्यता कळली, त्यामुळे त्यांना शरण जाऊन त्याच्या ठायी असलेला ज्ञातीचा व वर्णाचा अभिमान नष्ट होऊन तुकोबांचे शिष्यत्व पत्करले.
🪔
कचेश्वर ब्रम्हेचा जन्म वैदिक कुळात झाला. तुकोबांच्या अनुग्रहाने तो किर्तन करु लागला. पुढे त्यांचा तो मोठा भक्त झाला.
🪔
बहिणाबाई अकरा वर्षाची असतांना जयरामस्वामींच्या किर्तनांत तुकोबांचे वेदांत्यपर अभंग ऐकुन त्यांच्या दर्शनाचा ध्यास लागला असतां, तुकोबांनी तीला स्वप्नात दर्शन देऊन उपदेश केला.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१२
🪔
तुकोबांच्या शरीरावर अध्यात्मीक तेज इतके झळकत होते की, लोकांना त्यांच्यात पांडुरंग दिसत असे. बहिणाबाई आदी मंडळी मंबाजीच्या मठात उतरली ह्या मंडळीस त्याने आपल्या पाशांत ओढण्यासाठी तुकोबाविषयी मन कलुषित करण्याचा खुप प्रयत्न केला. रामेश्वर भट्टानाही भूरळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतू ही मंडळी फसली नाही. त्यामुळे मत्सराग्नी भडकला. त्याने बहिनाबाईची गाय कोंडून सोट्याने बडविले. ते वळ तुकोबाच्या पाठीवर उमटलेले दिसल्याने त्यांच्याविषयीची निष्ठा अधिकच बळावली. स्रीया आणि शुद्र ह्यांना अधिकार नाही, परंतु शुद्र समजल्या जाणार्या तुकोबांच्या वेदात्तर अभंगानी मंबाजीसारख्या ब्राम्हणाच्या फुसलावणीस न भुलता तुकोबाच्या चरणी लीन झालेत. अधिकार ही बाब परमेश्वराच्या हाती आहे. ही अधिकाराची गोष्ट जातीवर किंवा स्रीपुरुष भेदावर अवलंबुन नाही.
🪔
रामेश्वर भट्ट, कचेश्वर ब्रम्हे आणि बहिणाबाई या तिघांनाही त्यांच्या सात्वीक वृत्ती व आध्यात्मिक तेजजाने त्यांच्यात प्रत्यक्ष विठोबा दिसत असे. महाराष्टात वारकरी संप्रदायने भक्तीमार्गाची सुंदर व भव्य इमारत उभारली आणि तुकोबांनी त्यावर कळस चढविला." *तुका झालासे कळस* " प्रमाणे ते स्वतः कळस झालेत.
🪔
भगवंताने मानवांच्या परम कल्याणासाठी प्रगट केलेला धर्म म्हणजे *भागवतधर्म*. भागवतधर्म इतर धर्मापेक्षा अधिक व्यापक व दुरवर पोहोवचणारा आहे. यात जातपात, भेदभाव, धर्मभेद, स्री-पुरुष असा संकुचित भाव या धर्मात नाही. या धर्माची परंपरा फार जुनी आहे. वेदकालापासुन उपनिषधे, पुढे महावीर, बुध्द, चक्रधर, ज्ञानदेव, नामदेव, नानक, तुकाराम, त्याचप्रमाणे जीसस, महंमद, राजमोहन, महर्षि देवेद्रनाथ, केशव चंद्रसेन, माधवराव रानडे वगैरे मंडळींनी एका सुत्रात गोवलेली आहे. या सर्वांच्या चळवळींचा भागवत धर्मात अंतर्भाव होतो.
🪔
पंढरीची वारी, एकादशी व्रत, विठोबाच्या मुर्तीचे पुजन, भजन किर्तन, हा तुकोबांचा मार्ग होता. शुध्द भाव, चित्त निर्मळ ठेवणे, हीच मुख्य गोष्ट मानीत. त्याचबरोबर दया, क्षमा, शांती धरावी, परोपकारी वृत्ती, अनाथांना सहाय्य, परद्रव्य, परनारीची अभिलाषा न ठेवणे, परनिंदा, द्वेष, आकस न करता व्यवहारात चोख असावे, अशाप्रकारचा उपदेश करीत असे. देवाचा सहवास हवा असेल तर एकंदर वर्तन सत्याला धरुन पवित्र ठेवले पाहिजे. असा अमृताचा स्राव करणारे अभंग त्यांच्या वाणीतुन स्रवत असे.
🪔
विठोबा हे तुकोबांचे कुलदैवत. त्याची भक्ती करता करता परमार्थ मार्गात पाऊल पुढे टाकुन विठोबा म्हणजेच सर्व व्यापक विश्वंभर, अशी भावना ठेवुन त्यांनी साधनमार्ग चालु ठेवला. तुकोबांचा धर्म हा प्रेमाचा धर्म होता. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे, इंद्रिय दमन ह्या गोष्टी द्दृढ अभ्यासाशिवाय साध्य होत नाहीत.
🪔
तुकोबांना मुक्तीपेक्षा परमेश्वराच्या सेवेची व संतसमागमाची असल्यामुळे त्यांचा कल सामुदायीक धर्माकडे असुन आपण तरुण इतरांना तारावे, एकमेकांच्या समागमे वैकुंठ गाठावे, हेच त्यांचे ध्येय असल्यामुळे भजन, किर्तन, सत्संग अशा साधनाची त्यांना आवड होती. ते स्वतः नम्रतेची मुर्ती असुन जगन्मान्य पुरुष होते. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे ह्या गोष्टी द्द्ृढ अभ्यासाशिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच देवाचे सहाय्य मागुन संसाराचा मार्ग आक्रमत होते.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१३
🪔
तुकोबांच्या अश्या निस्पृह वृत्तीमुळे पती पत्नीत नेहमी वाद होत असे. रामेश्वर, मंबाजी वगैरे धर्ममार्तडांनी त्यांचा छळ केला, कारण तुकोबा निर्जिव गतानुगतिक नसुन जागृत वृत्तीचे जिवंत व तेजस्वी सुधारक होते. त्यांच्या उमेदिच्या दिवसांत दुष्ट चालींचा व नाना प्रकारच्या दांभिक आचारांचा तिव्र शब्दात निषेध करुन असल्या चालीरिती विरुध्द बंडाचा झेंडा उभारला. त्यांचा देव फक्त विठोबा. अडाणी लोकात भूताखेतांच्या पुजेवर, शुद्र देवभावनेवर त्यांनी ताशेरे झाडलेत.
🪔
वृक्षाचा कोमल अंकुर कठीण जमीनीतुन, पाण्याचा झरा जसा खडक फोडून बाहेर पडतो, त्याप्रमाणे तुकोबांसारख्या संताच्या ह्रदयात असणारा सद्विचार आणि सद्भावनांचा झरा खळखळ पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे बाहेर आल्याशिवाय राहु शकत नाही, ही एक निसर्गाची किंवा परमेश्वराची योजनाच असते. तुकोबांनी जे काही केले तेजनहित लक्षात घेऊन त्यांनी शुध्द मार्गाकडे वळावे म्हणुन! स्वतःची किर्ति किंवा मान सन्मानवाढवण्यासाठी नव्हे! बाह्य उपचारांचा त्यांना तिटकारा होता. दांभिकपणावर त्यांनी कोरडे ओढलेत.
🪔
त्यांच्या ठायी जीवाचे जीवपण व आत्म्याचे आत्मपण ही दोन्ही एकाच वेळी दिसुन येतात. जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन त्यांना स्वानंदप्रतिती होऊ लागल्यावर चित्सागरावर खेळणार्या आत्मस्वरुपाच्या व जीव स्वरुपाच्या सर्व कृती त्यांच्या अभंगातुन व्यक्त होत होत्या.
🪔
देवाबद्दल संत्कल्पना, त्यावर अखंड विश्वास अकृत्रीम व निरतिशय प्रेम, म्हणजेच धर्माचा पाया हीच निष्ठा ठेवुन यातील कर्मयोग, ज्ञानलालसा अवघा संसार या निष्ठेला जागुन पावन करावा हेच त्यांचे साधन होते. ज्यांच्या साध्याभोळ्या पण भावनोत्कट भक्तीरसाने संपुर्ण महाराष्ट आपलासा केला, ज्यांनी आपल्या शिकवणीने भक्तीभावा विषयक तत्वज्ञानांत फार मोठी भर घातली. संतशिरोमणी तुकाराम महाराज स्वतः महान भगवद् भक्त होते. शरण आलेल्याची देव उपेक्षा करत नाही ह्यावर त्यांची पुर्ण श्रध्दा होती.
🪔
ते नेहमी आत्मपरिक्षण करुन दोषांचा परिहार व्हावा, मन शुध्द व पवित्र राहावे म्हणुन सतत जागृत असत. नामस्मरण करण्यास मन आधी शुध्द लागते. औषध घेऊन पथ्य पाळले नाही तर जसा औषधाचा गुण येत नाही तसेच स्वैर आचरण करुन नुसते देव देव केल्याने काहीच उपयोग होत नाही. मठ स्थापणे, शिष्यशाखेचा विस्तार करणे अशा उपाध्या त्यांनी कधीच मागे लावुन घेतल्या नाहीत.
🪔
मेघवृष्टीप्रमाणे उपदेश परमात्म्यावरच केला. ते पराकोटीचे निस्पृह होते. त्यांनी वाईट मार्ग सोडुन धर्माने चला, हरिनाम घ्या, हे लोकांजवळ मागीतले तर देवाजवळ प्रेम, भक्ती मागीतली. शिवाजी महाराजांनी पाठविलेले दिवट्या, छत्री, घोडे, मोहरांनी भरलेले ताट त्यांचे घरी अठराशे दारिद्र्य असुन सुध्दा त्यांनी परत पाठवले.
🪔
इतकी निःस्पृहता जगांत तुकाराम महाराजांशिवाय कोणाजवळ असु शकते?
🪔
क्रमशः
संकलन -मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१४
🪔
तुकारामांची भक्ती एवढी जावल्य ठरली की, प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी आलेत. सुदाम्याप्रमाणे ते गरीब असल्याने पाण्यांत कण्या शिजवून *फाल्गुन शुध्द दशमीला* जेऊ घातले. तेव्हापासुन देहुला या दिवशी कण्याचा नैवद्य दाखवण्याची प्रथा देवाच्या भेटीच्या स्मरनार्थ पडली आहे. जीवभाव देवाला अर्पन करुन संबंध आयुष्यभर परमेश्वराची आराधना, परमार्थिक धनाची कमाई तुकोबासारख्या साक्षात्कारी संताने आपल्या आध्यात्मिक साठा आपल्यासाठी ठेवला आहे.
🪔
एका एकादशीला जिजाईला जवळ बोलावुन तुकोबांनी अकरा अभंगांनी परमार्थाचा उपदेश करुन म्हणाले, "मानवदेह हे शेत आहे, या शेताची प्राप्ती होऊन जे भक्की करतात त्यांना ज्ञानरुपी चांगले पीक येते. याचा ८०% सारा द्यावा लागतो, न दिल्यास काळाला जबाब द्यावा लागेल. पांच ज्ञानेंद्रिय आणि पांच कर्मेंद्रिय! यापैकी १०% सारा राबवुन दिला. ७०% सारा देण्यासाठी कांहीही एवज नाही. आपल्या देहात दहा इंद्रिय आहेत, त्यांचा उपयोग सुखौपभोगासाठी किंवा मानप्रतिष्ठेसाठी न करता कोणी शिव्या देवोत की, स्तुती करो असा कोणताही विचार न करता निरिह वृत्तीने देवास अर्पण केल्यास १०% ची फेड होऊ शकते."
🪔
ते पुढे म्हणाले, "देवाने माझा पिच्छा पुरवुन मन, मनोविकार सर्व हरण केले. आपल्याला हीन दशा आली म्हणुन वाईट वाटुन न घेता, खंत-खेद न मानतां नाशवंत गोष्टीची आसक्ती टाळुन कल्यानाचा मार्ग जर स्विकारला तर आपली कधीही ताटातुट, वियोग होणार नाही.मुलांबाळांत, संसारांत न गुरफटता मोहमाया पाशातुन मुक्त होऊन जन्म मरण्याच्या फेर्यातुन सुटका होण्यासाठी मोठ्या मनाने सर्वांना आपुलकीने सामावुन घेतल्यास उन्नती होईल. जवळची संपती चोराने लुटली, मुले नाहीतच, वासना दमण करुन मन वज्राप्रमाणे कठोर, सुखाचा हव्यास न केल्यास संसाराचे फाश तुटुन परमानंदाची प्राप्ती होईल."
" उद्या शुध्द पक्षाची व्दादशी व पर्वकाळ आहे. व्दिजांना बोलावुन आपल्या जवळचे सर्व शुध्द अंतःकणाने दान कर, परमेश्वर आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. जसे सांगीतले तसे वागलीस तर भवसागर तरुन जाशील. या उपदेशात त्यांनी कुठेही पती सेवा, किंवा पतीला देवाप्रमाणे मानावेचा चकार शब्दही आलेली नाही."
🪔
जिजाई संसारात गुंतलेली, तर तुकाराम रात्रंदिवस
🪔
ध्यानपुजनात मग्न असल्यामुळे तीच्यावरच संसाराचा भार पडत असे. परंतु ते तीला संसारातुन, मोहातुन मन काढण्यास परम सुखाचा लाभ होईल, तिन्ही लोकांत मान्यता मिळेल असे वारंवार सांगत असे.
🪔
तुकोबा आणि जिजाई एकत्रीत राहत, परंतु दोघांचेही मार्ग भिन्न असुन वेगवेगळ्या भुमीकेवर त्यांचे वास्तव्य होते. जिजाई रुळलेल्या कर्मठांच्या मार्गाने जाऊन, तीचा संसार मर्यादित असल्याने लौकीक आचार धर्म पाळीत, तर तुकोबांचे लक्ष अचल अशा धृव्यतार्याकडे, उच्चस्थानी असलेल्या देवाच्या चरणावर अधिष्ठान ठेवले होते. एकदा एकांताची संधी साधुन एका विलासप्रिय स्रीने त्यांच्याजवळ कामवासनेची इच्छा व्यक्त केली. तुकोबांनी तर इंद्रियावर विजय मिळवला असल्याने, परस्री मातेसमान आहे असे म्हणुन तीला फटकारुन परत पाठविले.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१५
🪔
तुकोबांच्या किर्तनाचा नाद एका भाविक भक्ताला लागला होता. घरात कितीही अडचण आली तरी तो किर्तन चुकवित नसे. एकदा त्याचा मुलगा खुप आजारी असल्यावर सुध्दा हा वेळ होताच किर्तनाला गेलाच. इकडे मुलगा आत्यंतिक होऊन प्राण सोडला. त्याची आई दुःखाने व संतापाने वेडीपिसी होऊन मुलाचे प्रेत उचलुन किर्तनस्थळी तुकारामांच्या समोर ठेवले, व अद्वातद्वा बोलु लागली. परंतु तुकोबा थोडेही विचलीत न होता श्रोत्यांना हरिनामाचा गजर करण्यास सांगुन स्वतः नामघोष सुरु ठेवला. हरिनामाचा गजर दाही दिश्यांनी दुमदुमले, आणि आश्चर्य म्हणजे ते मृत बालक जिवंत होऊन उठुन बसले.
🪔
डाॅक्टर व वैद्य शरीर सुस्थीतीत ठेवण्यासाठी जसे उपाय योजना करतात, तसेच मन आणि आत्मा ह्यांची वाईट अवस्थेतुन सुटका करुन अमृताचा लाभ देणे हेच संतजनांचे वैशिष्ट्य आहे. मेललं शरीर जिवंत करण्यांत विशेष अद्भुतपणा नसुन मेलेल्या आत्म्याला जिवंत करणे हे विशेष आहे.
🪔
एकदा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महारांजांच्या समाधी दर्शनास गेले असतां, प्रदक्षिणा घालीत असतांना कांही पक्षी तीथे कणसातले दाणे खात होते, पण तुकोबांच्या चाहुलीने भिऊन उडुन गेले. पक्षांना आपल्यापासुन त्रास झाल्याचे पाहुन त्यांच्या हळव्या मनाला अतिशय यातना झाल्यात. आपली भक्ती अद्याप अपुरी आहे असे मनांत विचार आल्याने तिथेच बसुन नामस्मरण सुरु केले. नामस्मरण करता करता देहभान विसरुन त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागली, इतकी की, ते विदेहावस्थेत पोहोचले. पक्षी परत येऊन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळु लागले. भानावर आल्यावर पक्षी अंगावर वावरत असलेले पाहुन त्यांना अतिशय आनंद झाला.
🪔
तुकोबाचा कोंडोंबा लोहकरे या शिष्याला काशीयात्रा करण्याची इच्छा झाली, म्हणुन द्रव्यासाठी तुकोबाला विनंती केल्यावर तुकोबांनी त्याला एक होन देऊन सांगीतले की, हा होन मोडुन यात्रेसाठी लागेल तो खर्च कर, परंतु त्यांतील एक पैसा राखुन ठेव म्हणजे शेवटपर्यत कमतरता येणार नाही.आणि यात्रा पुर्ण झाल्यावर माझा होन परत कर!
🪔
कोंडोबाचा विश्वास न बसल्यामुळे प्रचिती पाहण्यासाठी त्याने होन मोडुन यात्रेसाठी आवश्यक सामान खरेदी केले व एक पैसा बांधुन ठेवला. दुसर्या दिवशी त्या पैशाचा होन झालेला पाहुन आश्चर्यमाश्रीत आनंद झाला व यात्रेला निघुन गेला.
🪔
यात्रेवरुन परत आल्यावर त्याला मोह सुटल्यामुळे तुकोबाला होन परत न करता घरी लपवुन ठेवला व होन हरवला म्हणुन खोटेच सांगीतले. त्यावर तुकोबा स्तब्ध होऊन म्हणाले "तु होन गमावलास". कोंडोबा घरी येऊन पाहतो तर ठेवलेल्या जागेवरचा होन नाहीसा झाला. मनात खजील होऊन स्वस्थ बसला.
पैशाच्या लोभाने तुकारामासारख्या संतपुरुषाला फसवुन, सतत त्यांच्या सहवासांत राहुन होनाच्या लोभाने त्याने परमार्थाचा होन गमावला.
🪔
ह्यावरुन एवढे निश्चीत की, शुद्र विचार बलवान असतात, ते नाहिसे करण्याकरितां निकराचा प्रयत्न आवश्यक आहे, केवळ सत्पुरुषाच्या सहवासाने कृतार्थ होते असे मुळीच नाही.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
भाग-१६
🪔
तुकाराम महाराजांचे अवतार कार्य महाराष्ट उध्दाराच्या दृष्टीने फार उपयोगी पडले. त्यांनी भक्तीवृक्षाच्या छायेखाली महाराष्टातील निरनिराळ्या जाती, पंथाच्या हिंदुना एकत्रीत आणले.
🪔
त्यांची धार्मिक व परमेश्वराच्या बाबतील भेद नष्ट व्हावे म्हणुन जातीची कृत्रिमता, उच्चनिच्चता,स्री-पुरुष हे न मानण्याचे महान तत्व लोकांच्या गळी उतरवले. त्यांनी पक्षभेद व मतभेद नाहीसे करुन *भागवतधर्मरुपी* सुत्रात पध्दतशीरपणे ओळुन एकजीनसी हार तयार केला.
🪔
*न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ ।*
*सायुज्याचा पट न लगे मज ।।*
*देई तुझे नाम मज सर्व काळी ।*
🪔
*मागणें वनमाळी हेचि तुज ।।*
🪔
सर्व साधारणपणे जनसामान्याची कल्पना अशी आहे की, तुकाराम महाराज अंतकाळी देहासकट विमानात बसुन वैंकुठास गेलेत. परंतु या काल्पनिक वैंकुठगमनाची कल्पना भागवत धर्मिय तत्वात बसु शकत नाही. त्यांनी मोक्ष, सुख ज्या वैंकुठांत मिळते, त्या स्वर्गवासाची कल्पना सुध्दा कधी मनास शिवु दिली नाही. उलट त्यांच्या जिविताचा हेतु जनोध्दार व भक्तिप्रसारासाठीच आहे.
🪔
तुकोबांनी स्वर्गसुखापेक्षा पंढरपुर या वैंकुठास जास्त महत्व दिले होते. त्यांची इच्छा नसतांनाही जबरीने वैंकुठवास लादला असेल का? यापुर्वी कोणताही साधु-महंत किंवा सिध्दपुरुष सदेह वैंकुठास गेल्याचे एकही उदाहरण दिसत नाही, मग ही अशक्य गोष्ट फक्त त्यांनाच का चिकटवावी ? स्वर्गातुन त्यांचा देह नेण्यासाठी स्वतः देवाने विमान पाठवले हे जागृत मनाच्या कल्पनाशक्तीस न पटणारी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या विरुध्द वाटते.
🪔
तुकारामांना जर वैंकुठास जायचेच होते तर त्यांनी आषाढ किंवा महिण्याची निवड का केली नाही ? या दोन्ही महिण्यांचे महत्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण होते असे असतांना त्यांनी गमनासाठी फाल्गुन महिनाच का निवडला ? ते एकादशीला विशेष मानत असतांना एकादशी का नाही निवडली? शिवाय फाल्गुन महिण्यातील द्वितिया म्हणजे अत्यंत ओंगळ स्वरुपाचा, माणुसकी विसरणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा शिमग्याचे विभित्स स्वरुप असतांना हा दिवस निवडणे शक्य वाटत नाही.
🪔
त्यांच्या कोणीतरी शत्रुने वैरभावाने त्यांचा घात केला असुन प्रेत नाहीशे केले असावे ही संभावना जास्त वाटते. कारण फाल्गुन वद्य द्वितिया या दिवशी धुळमातीचा धुमाकुळाचा उपसर्ग होऊ नये म्हणुन ते करंजाई बेटाजवळ एकांतात भजनास बसले असावे, नंतर ते स्नानासाठी इंद्रायणी नदीत गेले असता वैर्याने कट करुन त्यांना डोहात बुडवले असावे, कारण हे दुष्ट कृत्य कोणी पाहु शकणार नाही आणि कदाचित कोणी पाहिलेच तर शिमग्याच्या थट्टामस्करीच्या रुढीखाली दबुन झाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
🪔
त्यांनतर ते दिसले नाहीत म्हणुन शोधाशोध सुरु झाली परंतु ते किंवा त्यांचा देह सापडला नाही, मात्र तीन दिवसांनी पंचमीला लोकांची दिशाभुल करुन त्यागाची खुण म्हणुन गोधडी, आणि भक्तीमार्गाची खुण म्हणुन टाळ, वीणा स्वर्गातुन पाठविली असा धूर्त डाव भासवला असावा.
🪔
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
८/११/२०, सकाळ १०:५७ - Akola Minakshi Deshmukh:
*संत तुकाराम महाराज !*
🪔
*अंतिम भाग-१७*
🪔
तुकाराम महाराज हे भक्त होते, योगी नव्हते.
🪔
वैकुंठगमनाच्या वेळी
तुकोबांचे वय ५०-५१ वर्षाचे होते, शरीरप्रकृतीही उत्तम होती,. शिवाय ते भागवत धर्माचे वारसदार असुन धर्मप्रसारक, कट्टर कर्मयोगी होते. परकीय सत्तेने घातलेला धुमाकुळ त्यांना सहन होत नव्हता, त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न पण सुरु होते.
*न घडे यावरी न धरावे धीर ।*
*पिडितां राष्ट देखोनी ।।*
🪔
लोकहित साधने हेच त्यांनी उदिष्ट, ध्येय ठरविले होते.
*तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता ।।*}
🪔
याच जनहिताच्या दृष्टीने ते अभंग निर्मिती करीत असत. किर्तनाव्दारे जनतेत नवचैतन्य, जनहिताचे, लोककल्यानाचे अनेक महत्वाचे प्रश्न त्यांच्या समोर असल्याने रात्रंदिवस झटत होते. शरीर धर्माची पर्वा नव्हती. अशा अनेक गोष्टींवरुन या लोकीचा त्याग करावा
🪔
तुकाराम महाराजांनी अभंगरुपाने महाराष्टास कायमचे ञृणी करुन ठेवले. ज्या अभंगवाणीचा प्रसार जगभर झाला अशी ती अमोल वाणी, ठेवा जपुन ठेवावा असा त्यांच्या वंशजांनी प्रयत्न केलेला दिसत नाही आपला वारसा, आपली गादी ही त्यागाची आहे याचा वारसदारांना पुर्ण विसर पडलेला दिसुन येतो.
🪔
तुकाराम महाराज शके १५७२ मधे इहलोकातुन नाहिसे झालेत.
हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
🪔
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्तीधन संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ॥४॥
🪔
*समाप्त
संकलन-मिनाक्षी देशमुख
*जगद्गुरु संत तुकाराम
*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे
मुळ पुरूष - श्रीसंत विश्वंभर बाबा*
🌹 👉 *श्रीसंत विश्वंभर बाबा हे श्री पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. यांचे मुळ गांव महाबळेश्वराचे पायथ्याशी असलेले प्रसिद्ध खोरे म्हणजेच जावळी हे होते. चंद्रगुप्त मौर्य क्षात्र घराणे म्हणजेच पुढे (मोरे) या नावाने रूढ झाले. वर वर्णन केलेल्या मराठ्यांचे आपापसांत वैर होते. या वैरास कंटाळून विश्वंभर बाबांनी जावळीची देशमुखी सोडून देहू गावी जाऊन राहू लागले. त्यांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची सेवा अविरत चालू होती. त्याप्रमाणे एकदा पायी चालत कार्तिकी वारीला विश्वंभर बाबा गेले असता पांडुरंगाचे दर्शनाने इतके मोहित झाले की, त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी कार्तिकी ते आषाढी पर्यंत १६ वाऱ्या केल्या. त्यानंतर त्यांनी महिना वारी चालू ठेवली व भगवान पांडुरंगाची सेवा केली. पुढे पुढे वृध्दापकाळामुळे त्यांना चालणे शक्य होईना, वारीचा त्रास होऊ लागला. तेव्हा प्रत्यक्षात त्या विटेवरच्या विठ्ठलाने त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले की, तुझी व्यथा, दुःख मला असह्य झाले आहे. त्यामुळे मी तुझ्या शेतात आलो आहे, तेथून मला गावात घेऊन जा व तेथेच माझी सेवा कर. खूण काय तर तुळशी, बुक्का "स्वप्नाप्रमाणे बाबांनी गावातील लोकांना सविस्तर वृत्तांत सांगून सर्वजण दिंडी घेऊन गेले असता. ज्या ठिकाणी तुळशी व बुक्का होता अशा ठिकाणी खोदले तेव्हा प्रत्यक्षात पांडुरंग व आईसाहेब रूक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. त्या मूर्तीची दिंडीने मोठ्या उत्साहाने मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा करून बाबांनी त्या मूर्ती आपल्या घरी स्थापन केल्या. आजही त्या मूर्ती देहूचे मंदिरात विराजमान असून त्यामुळेच श्री तीर्थक्षेत्र देहू प्रति पंढरपूर मानले जाते. आजही देहूचे परिसरातील भाविक शुद्ध वारीस देहूत येत असतात..... अशा त-हेने भगवत् सेवा करीत करीतच बाबांनी आपले जीवन पांडुरंग चरणी समर्पित केले...बाबांना दोन मुले होती हरि व मुकुंदा बाबांच्या पत्नीचे नाव आमाई होते.
आमाईने या दोन्हीही मुलांना पांडुरंगाची सेवा करण्याची विनंती केली. परंतु मुलांनी ऐकले नाही व दोन्ही मुले क्षात्र वृत्तीचे निघाले व ती सैन्यांत भरती होऊन राजसेवा करू लागली. मुलांच्या आग्रहामुळे नाविलाजामुळे आमाईस देहू सोडावे लागले व मुलांबरोबर जावे लागले. पुढे पराचक्र आले असता, दोन्ही मुले युध्दावर गेली व दुर्दैव असे की दोन्हीही मुले धारातिर्थी पडले. मातोश्री आमाईवर दुःखाचा डोंगर कोसळला ! आपल्याकडून पांडुरंगाची बंद केल्यामुळेच आपणावर हे संकट ओढवले असे समजून तिने दोन्ही सुनांना घेऊन परत देहूला जायचे ठरवले.... पूर्वी सती जायची प्रथा असल्यामुळे मुकुंदाची पत्नी पतीबरोबर सती गेली.
मात्र हरिची पत्नी गरोदर असल्यामुळे आमाईने तिला सती जाऊ दिले नाही. भगवंताची इच्छा असेल तर वंशवृध्दी होऊन तो आपली सेवा करून घेईल या उत्कट दृढ भावनेने आमाई सुनेसह देहूला परत आल्या व भगवान पांडुरंगाची अविरत सेवा करू लागल्या. त्याच सेवेचे फलित म्हणून हरिच्या पत्नीस मुलगा झाला व त्याचे नाव "विठ्ठल" ठेवण्यात आले. आमाईला मनोमन आनंद झाला व आपल्या संकल्पाप्रमाणे पांडुरंगाने सेवा करून घ्यायचे मान्य केले आहे. अशा कृतार्थ भावनेने आमाईने म्हणजेच विश्वंभर बाबांच्या पत्नीने आपले जीवन पांडुरंग चरणी समर्पित केले..... विठ्ठलाचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकराचा मुलगा कान्हया व कान्हयाचा पुत्र बोल्होबा म्हणजेच संत तुकोबारायांचे वडील होत. अशा त-हेने मागील सात पिढ्यांची पांडुरंगाची अविरत सेवा होऊनच तुकोबारायांसारखा महापुरुष या घराण्यात अवतरला. तो दिवस होता माघ शुद्ध ll ५ ll शके १५३० सन १६१० 🌺🌺
१) विश्वंभर बाबा २) हरि ३) विठ्ठल ४) पदाजी ५) शंकर ६) कान्हया ७) बोल्होबा ८) संत तुकाराम*
🪔
*संतसेवक - गुरुवर्य वै. आप्पासाहेब वासकर महाराज (बप्पा) फडाचा पाईक -* बळीराम दादा आळंदीकर 🚩
