वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

स्वभावे विचारता मही

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074844 · अभंग क्र. २९९

299.
स्वभावे विचारता मही ।
सम ब्रह्म दिशा दाही ।
एकु एकला पाही ।
सर्वाघटी बाईये वो ॥१॥
दुजे द्वैत हेतु सांडी ।
एक तत्वसार मांडी ।
हरिवीण इये पिंडी ।
नाही वासु वो माये ॥२॥
काय सांगो याच्या गोष्टी ।
अवघा दिसे हाचि सृष्टि ।
विश्वरुप स्वरुपकिरिटी ।
अर्जुना दिठी दावियले ॥३॥
ज्ञानदेवी दीप उघड ।
उजळूनी केलासे वाड ।
माया देवी आम्हा नाही चाड ।
अवघा गोड हरि आम्हा ॥४॥

अर्थ :
मी सहज पृथ्वीवर फिरत असता दाही दिशांत व सर्व जीवमात्रात एकच असणारे परब्रह्म भरुन राहिले आहे. असे पाहिले. याकरता अनेकत्वाच्या भावाला कारण जे द्वैत ते सोडून मुख्य सार जो परमात्मा श्रीहरि याच्याशिवाय शरीररुपी पिंडात कोणाचीही वस्ती नाही. अशी मनाची समज राहु द्या. अशा श्रीहरिच्या गोष्टी काय सांगाव्यात? सर्व सृष्टीत हाच व्यापून राहिला आहे. आणि एवढ्या करताच याने अर्जुनास विश्वरुप दाखविले. हा ज्ञानाचा दीप उजळून मी मोठा केला. म्हणून आम्हाला श्रीहरिच गोड आहे. दुसरी कशाचीही चाड नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग