वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

घातला दुकान । पढीये

🙏 3. संत तुकाराम · ABH-080322 · अभंग क्र. १७६५

1765.
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥
आम्ही भांडारी देवाचे । द्यावे घ्यावे माप वाचे ॥धृपद॥
उगवू जाणो मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥
तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥

अर्थ :
आम्ही परमार्थ रुपी दुकान टाकले आहे. आणि ज्याला जसा माल पाहिजे आहे तसा येथे उपलब्ध आहे. आम्ही देवाचे खजिनदार आहोत व आम्ही आमच्या मुखाने हरी नामाचे माप देतो व घेतो. आम्ही प्रत्येकाचे मन स्पष्टपणे जाणू शकतो आणि ज्याला हरिनाम संपत्तीची प्राप्ती झाली नाही त्याला ती प्राप्त करून देण्याचे कामही आम्ही करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दुकानात जो जसा मोल देईल त्या प्रकारचा खरा, खोटा माल आम्ही त्याला देतोअर्थात ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग