वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नाम जींही उच्चारण के

🙏 4. संत नामदेव · ABH-083423 · अभंग क्र. ७६४

764.
नाम जींही उच्चारण केले | तींही वैकुंठ साधिले |भवसागर पार पावले| उद्धरले हरिभक्त॥१॥
नाम दुर्लभ दुर्लभ| तारील हा पद्मनाभ|पुंडलिके करोनिया स्वयंभ| केशव मूर्ति केली उभी॥२॥
ऐसे अगाध हरी रूपडें| प्रत्यक्ष पुंडलिकापुढें|भक्ती काज कैवाडें|भीमातीरी उभा असे॥३॥
वर्णावया न पुरे शेष| वेदा न घालवे कास|तेथे शास्त्र काय घेती भाष| रूप वर्णावया हरीचें॥४॥
उद्धव अक्रूर द्वापारी | त्यासवे खेळली हरी|मग ते उद्धरिले अवधारी| ज्ञान देऊनि श्रीकृष्णें॥५॥
नामा म्हणे ऐसे नाम| हरिकथेसी धरी प्रेम |तरी तुझा धन्य जन्म| मनुष्य जन्मी असतां॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग