वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

धांव नारायण । माझ्या

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086761 · अभंग क्र. १९०९

1909.
धांव नारायण । माझ्या दुःखाच्या निरसना ॥१॥
संसारे मी कष्टलों । तुजलागीं शरण आलो ॥२॥
कोण सोडवील आता । तुजविन जी अनंता ॥३॥
तूचि मायबापा । निवारिसी सर्व तापा ॥४॥
एका जनार्दनी पाय । धरुनिया चित्ती राहे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग