॥ संत बंका ॥
1.
॥ संत बंका ॥
संत बंका अभंग गाथा
आधीच निर्मळ वदन सोज्वळ । विठोबा दयाळू पंढरीये ॥१॥
समचरण गोड गोजिरी पाउले । कर मिरवले कटावरी ॥२॥
ध्यान दिगंबर तुळशीमाळा गळा । पांघुरया पिंवळा पीतांबर ॥३॥
बंका म्हणे सर्व सुखाचे आगर । तो हा विटेवर विठ्ठल देवो ॥४॥
