वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

स्वप्नींचेनि सुखे मा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074842 · अभंग क्र. २०६

206.
स्वप्नींचेनि सुखे मानिताती सुख ।
घेतलीया विख जाईल देह ॥
मोलाचे आयुष्य दवडितोसी वाया ।
माध्यान्हींची छाया जाय वेगी ॥
वेग करी भजना काळ यम श्रेष्ठ ।
कैसेन वैकुंठ पावशील झणी ।
बापरखुमादेविवरू विठ्ठल उभा ।
सर्वत्र घटी प्रभा त्याची आहे ॥

अर्थ :
स्वप्नातील सुखीला सुख मानणे मिथ्या आहे ते सुख नसुन विष आहे ते घेतले तर देह जाईल मोलाचे आयुष्य का वाया दवडत आहेस. ज्याप्रमाणे माध्यानकाळची छाया आपलीचअसते. पण ती एका क्षणात जाते. म्हणून तू हरीभजनाचा वेग कर कारण काळ मागे लागला आहे मग वैकुंठ कसे प्राप्त करशिल. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठोबाराय भक्ताकरिता विटेवर उभे आहेत व त्याचेच ज्ञान सर्व जीवांच्या बुद्धीत आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग