तुर्येमध्ये माझा अखं
436.
तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास ।
निवृत्ति का अविनाश तुर्या करी ॥१॥
स्थूळदेह निमता सूक्ष्म उरता ।
कारणी हारपता कैसे झाले ॥२॥
ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे ।
निवृत्तीने आनंदे दाखविले ते ॥३॥
अर्थ :
माझा अखंड रहिवास तुर्येच्या अवस्थेत असतो. निवृत्तीनाथही म्हणतात की या तूर्येत मनुष्य अविनाशरूप होतो. याकरिता लय चिंतनाने स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन्ही देहांचा महाकारण देहात लय पावतो. ही जी चौथी अवस्था तिला तुर्या अवस्था म्हणतात. या अवस्थेनंतर मनुष्य अविनाश पदाला प्राप्त होतो. व त्या अविनाश पदाचे ज्ञान निवृत्तीनाथांनी आनंदाने मला करून दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
