वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

येरीकडे गोकुळाभीतरी।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089922 · अभंग क्र. ३५

35.
येरीकडे गोकुळाभीतरी।
येताचि परमात्मा श्रीहरी।
विश्वकर्मा येऊनिया निमिशावरी।
नगर शृंगारी कौतुके ॥१॥
निजेलीचे असता नारीकुमरे।
शृंगारिली वस्त्रे अळंकारे।
वृध्द होताती ते निमासुरे।
रुंपे मंडित योजिली ॥२॥
धन कनक घरोघरी।
नाना धान्याचिया परी।
सुख सोहळा वर्ते शरीरी।
पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥
नाना फळफळावळी।
सुमने वरुषती वृक्षातळी।
एकैक सुखाची नव्हाळी।
वर्ते गोकुळी निजानंर्दे ॥४॥
कामधेनु ऐशी गुरे।
नंदिनीचिये परीचे वासुरे।
प्राप्त:काळी देखती नारीनरे।
परम विस्मये दाटली ॥५॥
लक्ष्मी न समाय गोकुळात।
लेणी लुगडी अंळकारमंडित।
धन संपत्ती नाही गणित।
जेथे श्रीकांत वस्ती आला ॥६॥
निळा म्हणे सुखाची मरणी।
गाई गोवळा आली गौळणी।
सारस्वते घोकिली तैशी वाणी।
मधुर शब्दे अनुवादती ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग