वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

परब्रह्मा मूर्ति विठ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084472 · अभंग क्र. ६५४

654.
परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥
तयाचे चरण आठवी वेळो वेळा । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥
अविनाश सुख देईल निश्चये । करी पा लवलाहेंलाहो त्याचा ॥३॥
श्रीविठ्ठलचरणीं शरण तू जाई । एका जनार्दनी पाही अनन्यभावें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग