वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अमित सूर्य प्रकाशले

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074377 · अभंग क्र. ६१८

618.
अमित सूर्य प्रकाशले तेज उदयो जहाले ।
ज्ञानज्योति फांकले दुणावोनी वो माय ॥१॥
दामोदर नामे मना बांधिले दावे ।
निरंजन म्हणावे आपणा वो माय ॥२॥
गुणचि नाही त्यासी काय लाऊ गुण ।
अतीत निरंजन देखिला वो माय ॥३॥
डोळा जरी पाहो तरी वो डोळियासी अरूवारू ।
सेऊ म्हणो तरी पारू न कळे खेवावो माय ॥४॥
आता असो हव्यासु लागला निजध्यासु ।
निरंजनी सौरसु करीतसे वो माय ॥५॥
आता आहे तैसा असो माझ्या हृदयींच वसो ।
हा रखुमादेविवरू विठ्ठलु वो माय ॥६॥

अर्थ :
अपरिमित सूर्य एकत्र केले असता जे तेज दिसेल त्या तेजापेक्षाही अधिक पंज ज्ञानस्वरूप परमात्मा आहे. तोच अंतःकरणामध्ये दुप्पट रूपाने प्रगट झाला. त्याच्या सगुण स्वरूपाचे नांव दामोदर असे आहे. त्या नांवाचे माझ्या मनाला जसे काही दावेच बांधले आहे. म्हणून त्या दामोदरालाच निरंजन म्हणावे. वस्तुतः त्याला गुणच नाहीत. म्हणजे तो निर्गुण आहे. मग त्याला गुण लावावेत कसे? म्हणून तो निरंजन परमात्मा मी पाहिला आहे त्याला डोळ्यांनी पहावे म्हटले तर तो निरवयव असल्यामुळे पाहता येत नाही. त्याला हातात घ्यावे असे म्हटले तर तो अपार आहे. तेव्हा अशाला आलिंगन कसे द्यावे. ते कसेही असो. पण मनाला त्याचा वेध लागला आहे खरा. त्याचा भोग अद्वितीय स्वरूपानेच घेता येईल. रखुमादेवींचे पती श्री विठ्ठल कसा आहे याचा विचार करण्यापेक्षा तो जसा असेल तसा माझ्या हृदयांमध्ये राहो म्हणजे झाले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग