वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

कृष्ण नाटक नाटक । या

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081011 · अभंग क्र. २८

28.
कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक ।
आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥
भाविका दावितो कवतुक । बाळ्या भोळ्या भोगवि सुख हारितो त्यांचे जन्म दु:ख ।
सुखसमाधी बैसवी ॥
गोपाळामाजी क्रीडा करी । सवे गोपिका सुंदरी ।
हात टाकुनी खांद्यावरी । कैसा रळिया करितसे ॥
कोणा न कळे याचा पार । भुलवितो नरनारी ।
बळ चुकवी जन्मफेरा । आढळपदी बैसवी ॥
बोधला म्हणे भुलविले कैसे । बळच लाविले आपले पिसे ।
पूर्वपुण्ये ओढे कैसे । थोर भाग्य आमचे ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग