वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

खेळे कान्हा यमुनेचे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087488 · अभंग क्र. २९९

299.
खेळे कान्हा यमुनेचे तटी । राखितो गोधनें घेउनी हाती काठी ॥१॥
पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥
गोप गोंधने सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥
एका जनार्दनी खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग