माझिये मनीचा जाणा हा
214.
माझिये मनीचा जाणा हा निर्धार । जिवासी उदार झालो आता ॥१॥
तुजवीण दुजे नाही आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥२॥
ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संती ॥३॥
जीवपणा तुझ्या ठेवियला पायी । हेची आता नाही लाज तुम्हा ॥४॥
तुका म्हणे संती घातला हवाला । न सोडी विठ्ठल पाय तुझे ॥५॥
