वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

मत्स्यकूर्मशेषा कोणा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079198 · अभंग क्र. १०७८

1078.
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥
काय धाक आम्हा कासयाची चिंता । ऐसा तो असता साहाकारी ॥धृपद॥
शंखचक्रगदा आयुधे अपार । वागवितो भार भक्तांसाठी ॥२॥
पांडवा जोहरी राखिले कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥

अर्थ :
मत्स्य, कूर्म, शेष हे मोठे अवतार आहेत पण त्यांना पृथ्वीचा भार वाहण्यासाठी कोणाचा आधार आहे तर त्यांना या देवाचा आधार आहे. आणि असा देव आमचा सहाय्य करणारा असताना आम्हाला कोणाची व कशाची चिंता असणार आहे ? आमचा देव भक्तांसाठी शंख, चक्र, गदा असे आयुधे अनेक वागवीत असतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात की पांडव लाखेच्या घरात सापडले होते त्यावेळी त्यांना युक्तीने ज्या देवाने बाहेर काढले तो देव माझा कैवारी झाला

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग