वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

उपचारासी वांज जालो ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078191 · अभंग क्र. २१४५

2145.
उपचारासी वांज जालो । नका बोलो यावरी ॥१॥
असेल ते असो तैसे । भेटीसरिसे नमन ॥धृपद॥
दुसऱ्यामध्ये कोण मिळे । छंद चाळे बहु मते ॥२॥
एकाएकी आता तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥

अर्थ :
देवा आता मी तुमची पूजा करण्यास उपचारास असमर्थ झालो आहे त्यामुळे आता याविषयी माझ्याशी काहीही बोलू नका. देवा आता माझ्यापुढे कोणतेही भूतमात्रा येऊ द्या, कोणताही जीव येऊ द्या मी त्यांना तुझ्यासारखा समजेन व त्यांना वंदन करेन. या जगामध्ये अनेक छंद, अनेक चाळे आणि अनेक मते असणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आता कोण मिसळेल? तुकाराम महाराज म्हणतात मी आता एकाएकीच या लौकिकका च्या बाहेर पडलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग