कृष्ण सहाय्य पांडवां
2107.
कृष्ण सहाय्य पांडवांसी | ते भोगिती तष्टचर्यासी |साह्य केले हरिहरासी | प्रारधे कोणासी टळेंना ॥१॥
ऐसी प्रारब्धाची ठेव | जाले भिक्षुक पांडव |राज्य -घोडे 'भाग्य सर्वे | सांडियिला ठाव प्रारब्धे ॥२॥
दारीर संचिता आंधीन | धर्मराज हिंडे वन |कर्मे बुडाळा रावण | आणि दुर्योधन प्रारब्धे ॥३॥
अभिमाने शिद्युपाळ | कृष्ण हस्ते जाला काळ |यादव निमाले सकळ | केले निर्मूळ प्रारब्धे ॥४॥
कर्मरेखा टळेंना | बाण लागला जंगज्जीवना |कृष्णे सांडिल्या गोपांगना | हे नारायणा प्रारब्ध ॥५॥
कामबुद्धीचे सुख | अति मानिति ते मूख |चंद्रासी लागला कलंक | इंद्रासी दुःख प्रारब्धे ॥६॥
|हरिश्चंद्र तारामती | घोर जन्मांतर भोगिती | नळराव पुरुषार्थी | तयाच्या विपत्ति प्रारब्धे ॥७॥
पतिब्रता सुशीळ | दमयंती पाळे पोळे |ऐसे अनिवार कपाळ | भोगी दुष्काळ प्रारब्धे ॥८॥
|ऐसी अनिवार जन्मांतरे | राज्य सांडिले रघुवीरे |संवे मेळवूनि वांनरे | फिरवी दिगंतरे प्रारब्धे ॥९॥
फिरत असता काय जाले | पुढे प्रारब्धओढवले |जातनकीस राक्षसे नेळे | कष्ट भोगविले प्रारब्धे ॥१०॥
कर्मा आधीन शरीर | पुर्ण ब्रह्म रामचंद्र |रघुपति विष्णूचा अवतार | पाठी जन्मांतर नामा म्हणे ॥११॥
