वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

अरे अरे ज्ञाना ज्ञान

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074239 · अभंग क्र. ५७२

572.
अरे अरे ज्ञाना ज्ञान उघडे बोलसी ।
तुझा तूचि होशी हरि ऐसा ॥१॥
आपुले ते झांकी पर ते दावी ।
पश्यंतिये भावी मध्यमे राहे ॥२॥
तत्त्व तेचि धरी रजोगुण चारी ।
पंचमा आचारी सांपडती ॥३॥
षड्रसी भोक्ता हरिरूप करी ।
सप्तमा जिव्हारी कळा धरी ॥४॥
अष्टमा अष्टसिद्धी अष्टांग नेमेशी ।
ते जीवेभावेंसी तूचि होसी ॥५॥
नवमा नवमी दशमावृत्ति ।
एकादशी तृप्ती करी ज्ञाना ॥६॥
ऐसा तू एकादश होई तु रे ज्ञाना ।
द्वादशीच्या चिन्हा सांगो तुज ॥७॥
निवृत्ति द्वादश गुरुसेवनी भाष्य ।
एकविध कास घाली ज्ञाना ॥८॥

अर्थ :
अरे ज्ञाना आत्मस्वरूपज्ञानाविषयी तू इतका निःसंदेह आहेस की ते ज्ञान तू स्पष्ट सांगत आहेस. तो तुझा आत्मा परमात्मरूप आहे. शरीरादिकाच्या ठिकाणी दिसणारे कर्म उपासनेचे सहज व्यवहार तेही परमात्मरूपच आहेत. तुला झालेले आत्मज्ञान लोकसंग्रहाकरिता म्हणजे मूढ जनांना मार्गी लावण्याकरिता तू आपले यथार्थ स्वरूप झांकून परमात्म उपासना साध्य आहे असे दाखवून पश्यंतीमध्ये भावना धरून, मध्यमेमध्ये जप करीत राहा. पण या करण्यांत तत्त्वमात्र सोडू नकोस. शरीरादिकाच्या ठिकाणी रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या चार प्राणाहून मुख्य जो पाचवा प्राण, तो प्राणायाम करून स्वाधीन ठेवला जातो. ते सर्व प्राण परमात्मरूपच आहेत. तसेच षड्रसाचा भोक्ता जीवही परमात्म स्वरूपच आहे. पंचप्राण, मन व बुद्धी या सातांना जीवन देणारी आत्मकला बळकट कर. आठ प्रकारच्या अष्ट सिद्धी, अष्टांग योगाने प्राप्त होणाऱ्या त्याही निश्चय करून परमात्मस्वरूपच आहेत. ५नवविधा भक्तीचे लक्ष जे दशम् त्या दोघांचे ऐक्य ही एकादशी करून (म्हणजे जीवब्रह्मैक्य करून) त्या ज्ञानाने तृप्त हो. व तृप्त झाल्यानंतर सद्गुरू सेवा ही जी बारावी कला तिची लक्षणे मी तूला सांगितली आहे. त्या गुरूसेवेची कास धरून राहा हे ज्ञान माझ्या श्रीगुरूरायांनी शांकरभाष्यानुरूप मला सांगितले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग