वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सत्यभामा माये अन्नपू

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090122 · अभंग क्र. २७

27.
सत्यभामा माये अन्नपूर्णा होय । वेळोवेळी सूये कवळु मुखी ॥१॥
राहिरखुमाई आदिमाता मोहे । नामा तो उपाये बुझाविती ॥२॥
घे रे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाळा । आवडसी गोपाळा प्रीतीहूनी ॥३॥
कुरवाळीतो हरि नुघडी तो दृष्टी । सप्रेमाच्या पोटी आधिक होसी ॥४॥
धरुनी हनुवटी पाहे कृपादृष्टी । आनंदाचे सृष्टी माजि नामा ॥५॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि । यासी परोपरी कवळु देतु ॥६॥

अर्थ:
प्रत्येक संतांच्या तोंडात काल्याचा प्रसाद भरवताना सत्यभामेने जणु अन्नपूर्णेचे रुप घेतले होते. नामदेवाच्या मोहाने राहिरखुमाबाई त्यांना भानावर आणण्यासाठी अनेक उपाय करु लागल्या.दोघी अत्यंत लडिवाळपणे नामदेवांना तो ब्रह्मरस काल्याचा घास घे म्हणुन सांगत आहेत. त्या भगवंताने तुला कुरवाळल्यामुळे तुझी भावसमाधी जास्त दृढ झाली असुन तु त्यामुळे डोळे उघडत नाहीस.पुन्हा देवाने नामयाच्या हनुवटीला धरुन त्याला कृपादृष्टीने पाहिले. त्या प्रेमामुळे नामदेवराय आनंदाच्या सृष्टीत निमग्न झाले. निवृत्तिनाथ म्हणतात मला, ज्ञानदेवांना, सोपानदेवांना, चांगदेवांना परिपूर्ण काला दिला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग