(वासुदेव)
3929.
(वासुदेव)
बोल अबोलणे बोले । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरांत घरकुल केले । नेणो आंधार ना उजेडले गा ॥१॥
वासुदेव करितो फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी काही तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातो माघार गा ॥धृपद॥
हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे । गजर होतो बहु मोठ्याने । नाही निवडिली थोर लहाने । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥२॥
मी वासुदेव तत्वता । कळो येईल विचारिता । आहे ठाउका सभाग्या संता । नाही दुजा आणीक मागता गा ॥३॥
काही जागाचि निजलासी । सुने जागोन दारापासी । तुझ्या हितापाठी करी वसवसी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥
ऐसे जागविले अवघे जन । होते संचित तीही केले दान । तुका म्हणे दुबळी कोणकोण । गेली वासुदेवा विसरून गा ॥५॥
अर्थ :
ब्रम्हज्ञान हा विषय स्वत:चा नसताना देखील काही लोक वरवर ब्रम्हज्ञानाच्या खूप गोष्टी बोलतात परंतु अंत:करणामध्ये ब्रम्हासंबंधाविषयी ते निजलेले असतात. अशा शब्दज्ञानी लोकांनी जगतरुपी घरामध्ये घरकुल केले आहे किंवा ईश सृष्टीच्या घरात पुन्हा स्वत:ला राहण्याकरता एक नवे घरकुलच केले आहे मग अशा शब्दज्ञानी लोकांच्या ठिकाणी अंधार आहे की उजेड आहे हे काही समजत नाही. वासुदेव तुमच्या देहरुपी वाडयामध्ये व घराच्या बाहेर दारामध्ये परमार्थ जागृतीविषयी फेरा करीत आहे. अरे कुणी काहीतरी दान पुण्य करा जर कुणी काही वासुदेवाच्या उत्तराला जाब दिला नाही तर तो वासुदेव मागे जाईल हे लक्षात ठेवा. हातामध्ये टाळ, वीणा व मुखामध्ये हरीचे नाम तो वासुदेव गात आहे व हरीनामाचा मोठा गजर तेथे होत आहे. अरे त्याने दान देण्याविषयी लहान मोठयांच
