वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ५, गौळणी अभंग ८५८ ते ८७०

चालता लवडसवडी ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074689 · अभंग क्र. ८६८

868.
चालता लवडसवडी ।
बाहुली मुरडली ।
माथा गोरसाची दुरडी ।
जाय मथुरे हाटा ।
सवेंची विचारी जीवी ।
महियाते सादावी ।
तव तो अवचिता पालवी ।
नंदानंदनु ॥
पाहे पा सुखाचेनि मिसे ।
झणी करी अनारिसे ।
तेव्हा उरले ते कैसे ।
माझे मनुष्यपण ।
विनवी सखीयाते आदरे ।
तुम्ही गुह्यांची भांडारे ।
अघटित घडिली या शरीरे ।
प्रगटित न करा साजणी वो ॥१॥
काय करणे वो काय करणे वो ॥धृ॥
देखोनी सांवळा तनु ।
लुब्धला माझा मनु ।
लागलेसे ध्यानु ।
द्वैत निवडे ना ।
डोळा भरुनीया बाळा ।
देखे श्रीरंगु सांवळा ।
वेथे वेधल्या सकळा ।
गोपी गोविंदा सवे ।
ठेला प्रपंचु माघारा ।
भावो भिनला दुसरा ।
पडिला मागिल विसरा ।
कैचे कैचे आपुलेपण ॥
सहज करिता गोष्टी ।
पाहाता पडिली मिठी ।
जाली जन्मेंसाठी सखियेसाजणी वो ॥२॥
ऐसी सोसिता सोसणी ।
सखी झाली विरहिणी ।
आजि मथुराभुवनी ।
मज गमेल कैसे ।
सरले सांजणे विकणे ।
निवांत राहिले बोलणे ।
पूर्ण गोरसा भरणे ।
माथा त्याजूनिया ।
जाली अकुळांचे कुळ ।
तनु जात बरळ ।
फिटले भ्रांती पडळ ।
दोन्ही एक जाली ॥
बापरखुमादेवीवरी ।
अवस्था लाऊनी पुरी ।
भावे भोगूनी श्रीहरि ।
मन मुक्त साजणी वो ॥३॥

अर्थ :
एक गौळण गोरसाची भांडी दूरडीत घेऊन मथुरेच्या बाजारांत धांदलीने जात असता एकाएकी बाहुली मुरडली तो श्रीकृष्ण केव्हा भेटेल असा विचार करीत असता तो तिच्या मनांतला विचार श्रीकृष्णाने जाणून तिच्यापुढे स्वतः श्रीकृष्ण प्रगट होऊन तिला खूण करुन बजावू लागले. सुखप्राप्तीच्या निमित्त इच्छेने संसाराकडे मन जाऊ देशील? असे बोलल्याबरोबर माझे मनुष्यपण कसे उरेल? ही माझी कृष्णसबंधाने झालेली स्थिति तुम्ही गुप्त ठेवाल अशी माझी खात्री असल्यामुळे माझ्या शरीराची कृष्णमय झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवा. काय करावे वो ! ती कृष्णांची सांवळी तनु बघितल्याबरोबर माझे मन लुब्ध होऊन गेले. काय करावे सखे? त्याचे ध्यान लागून गेले. कृष्णाशिवाय डोळ्यांना द्वैत दिसेनासे झाले. तो बालक सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण बधितल्याबरोबर मीच काय सर्व गोपीना वेध लागून गेला. प्रपंच आठवेनासा झाला. दुसरा भाव नाहीसा झाला. मागील प्रापंचिक गोष्टीचा विसर पडला. तेथे आपलेपणा ठेवा कोठे. सहज त्या कृष्णाची गोष्ट बोलता बोलता एकदम दर्शन होऊन जन्माचे सार्थक झाले. अशी ती गौळण श्रीकृष्ण परमसौख्याचा उपभोग घेत असतांना भगवान एकाएकी गुप्त झाले. त्यामुळे ती विरहिणी होऊन म्हणते. आज मला मथुरेत करमेल कसे? दही दूध विकणे वगैरे सर्व व्यवहार संपले. बोलणे थांबले. माझ्यावरची पाटी टाकून पूर्ण गोरस जो परमात्मा त्याने मी परिपूर्ण झाले. माझे कुळ नष्ट झाले आता शरीर व्यवहार अव्यवस्थित झाला. कारण देहाभिमानाची भ्रांती गेली त्या श्रीकृष्णाचे व माझे ऐक्य झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण परमात्मा त्याने माझ्या भावाचा भोग घेऊन व मला परमात्मरुप करुन श्रीहरिने मनाला संसारांतून काढून मुक्त केले. असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग