वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

अग्निच्या पाठारी पिक

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074460 · अभंग क्र. ५०८

508.
अग्निच्या पाठारी पिके जरी पिक ।
तरी ज्ञानी सुखदुःख भोगितील ॥१॥
काळोखामाजी जैसे शून्य हारपे ।
मायोपाधि लोपे तया ज्ञानी ॥२॥
नक्षत्रांच्या तेजे जरी इंदु पळे ।
तरी ज्ञानी विकळे पुण्यपाप ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठलु राया ।
घोटुनिया माया राहियला ॥४॥

अर्थ :
जसे अग्निच्या डोंगरावरील सपाटीवर पीक येणे शक्य नाही त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरूषाला सुखदुःखाचा भोग होणे शक्य नाही. काळोखात जसे काही दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरूषाची मायारूप उपाधी नाहीसी होते. जर नक्षत्रांच्या तेजाने चंद्र लोपून गेला असता तर ज्ञान्याला पापपुण्य लागले असते. माझे पिता व रखुमाईचे पती हे विठुराया, तो ब्रह्मज्ञानी पुरूष मायेचा निरास करून राहिलेला असतो. त्यामुळे त्याला जन्म येणे शक्य नाही. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग